Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एसटीच्या जागेवर प्रत्येक जिल्हयात रुग्णालय, कोल्हापूर, पुण्यातील रुग्णालयासंबंधी सादरीकरण अधिकारी-कर्मचाऱ्यांची क्रिकेटची सामने, संतोष जोशी, अतुल आकुर्डे, सचिन सांगावकरांनी लुटला फलंदाजीचा आनंदसुरेंद्र जैन परिवारातर्फे सीपीआरला एक हजार चष्मे प्रदानश्री.आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन संकल्प उपक्रमआंतरराष्ट्रीय खेळाडूंशी संवाद, तरुण खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप ! कोल्हापूर बॅडमिंटनचा सुवर्णसोहळा !!व्यापारी-उद्योजकांमध्ये शुक्रवारपासून रंगणार क्रिकेट सामनेकेडीसीसी बँकेच्या २५ अधिकाऱ्यांना व्यवस्थापक-उपव्यवस्थापकपदी बढत्या न्यू कॉलेजमध्ये सतरा जानेवारीला राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धायु-डायस प्रणालीत राज्यस्तरावर कोल्हापूर जिल्हयाचा गौरव, दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांचा पुण्यात सन्मान !!मारुतराव कातवरे हे समाजसेवेतील वेडा कुंभार - आमदार सतेज पाटील

जाहिरात

 

आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी संवाद, तरुण खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप ! कोल्हापूर बॅडमिंटनचा सुवर्णसोहळा !!

schedule14 Jan 25 person by visibility 36 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पद्मश्री, शिवछत्रपती आणि ध्यानचंद पुरस्कार प्राप्त खेळाडूंशी संवाद, तरुण खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप, आंतरराष्ट्र्रीय स्तरावरील खेळाडूंच्या सहवासामुळे भारावलेली मने असा माहौल सोमवारी कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या व्यासपीठावर अनुभवायास मिळाला. निमित्त होतं, कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्तीचे !

यानिमित्त रेसिडेन्सी क्लब येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रेसिडेन्सी क्लब येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू व प्रशिक्षक प्रकाश पदुकोण, पद्मश्री  मुरलीधर पेटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्रीकांत वाड, ध्यानचंद पुरस्कार विजेती खेळाडू तृप्ती मुरकुटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.  खासदार शाहू महाराज यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.

कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसएिशनचे अध्यक्ष सतीश घाटगे यांनी असोसिएशनच्या  सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा आढावा घेतला. कोल्हापुरात मल्टिपर्पज बॅडमिंटन हॉल उभारणी प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थितांच्या कोल्हापूर बॅडमिंटन असोसिएशनच्या वेबसाइटचे अनावरण करण्यात आले. तसेच विशेषांक प्रकाशित केला.

यानंतर उपस्थिती मान्यवर खेळाडूंनी उपस्थितांशी संवाद साधला. प्रत्येकाने आपआपली कारकिर्दी उलगडताना नवोदित खेळाडूंना मौलिक मंत्र दिला. बॅडमिंटन खेळातील कौशल्य, तंत्र, मोठया स्पर्धेत खेळतानाची मानसिकता याविषयी मार्गदर्शन केले. मोठया स्पर्धेत यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज आहे. केवळ जिल्हास्तरवर खेळण्यापुरते ध्येय ठेवू नका. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची, जिंकण्याची जिद्द  हवी. मोठया स्पर्धेत खेळताना संयम, दबावात खेळण्याची सक्षमता अंगी हवी अशा शब्दांत त्यांनी मार्गदर्शन केले.

 असोसिएशनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू शोभा मूर्ती, पुरस्कारप्राप्त खेळाडू मयूर तावडे, आरती पाटील, संयोगिता घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दकधीयानी पाटील, हृषीकेश साखरपे, इकबाल मैंदर्गी, जान्हवी कानिटकर, करण जाधव, पौरुष कुलकर्णी,  प्रतीक रानडे, प्रेरणा आळवेकर, राहुल काणे, रुतिका कांबळे, सारंग देशपांडे, सरोज सावंत, सुरेश नाडगौंडे, वैभवी सबनीस, वैशाली आगाशे, वर्षा नाडगौंडे, ऋचा आळवेकर, सिद्धांत घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद भोसले, तन्मय करमरकर, सुमित चौगुले, चंद्रशेखर सोवनी, साईनाथ खणगाव, योगिनी कुलकर्णी, अरुणा रसाळ, जगदीश काणे, शिरीष गुर्जर, सरिता गुर्जर आदी उपस्थित होते. केदार नाडगौंडे यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes