+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Jan 23 person by visibility 417 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : १९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून आजरा हायस्कूल, आजरा या संस्थेच्या वारी या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले. मराठा मंदिर अ.के. देसाई हायस्कूल, रत्नागिरी या संस्थेच्या
राखेतून उडाला मोर या नाटकास द्वितीय पारितोषिक तसेच चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फाउंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या या चिमण्यांनो परत फिरा रे या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. या तिन्ही बालनाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.   तीन ते पंधरा जानेवारी २०२३ या कालावधीत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर  व सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे बालनाट्य स्पर्धा झाल्या होत्या. सांस्कृतिक कार्य संचालनालया तर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे कोल्हापूर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे- : दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक विजय पोतदार (नाटक- वारी), द्वितीय पारितोषिक संतोष गार्डी ( नाटक-
राखेतून उडाला मोर), तृतीय पारितोषिक पल्लवी तोडकर (नाटक- या चिमण्यांनो परत फिरा रे), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक संतोष कालेकर (नाटक- वारी), द्वितीय पारितोषिक साईप्रसाद शिर्सेकर (नाटक- राखेतून उडाला मोर), नेपथ्य प्रथम पारितोषिक तानाजी पाटील (नाटक- वारी), द्वितीय पारितोषिक विजय केसरकर (नाटक- सावधान कोर्ट चालू आहे), रंगभूषा : प्रथम पारितोषिक आय. के. पाटील (नाटक- वारी), द्वितीय पारितोषिक संग्राम भालकर (नाटक-या चिमण्यांनो परत फिरा रे) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक वेदिका पोतदार (नाटक- वारी) व सुमेध पाटील (नाटक वंदे मातरम ), अभिनयासाठी प्रमाणपत्रे तनया गुणवत्ता लिंगायत (नाटक- राखेतून उडाला मोर), प्राची मेटकरी (नाटक- कमळीचा चिकाचा खरवस), उर्वी मराठे (नाटक- शुटींग शुटींग), मृणाल खेडेकर (नाटक- एका चित्राची गोष्ट), श्रावणी पसारे (नाटक- थेंब थेंब श्वास), अभिषेक करंजे (नाटक- पाणीबानीचा वग), भावेश खरात (नाटक- राखेतून उडाला मोर), शार्दुल कुलकर्णी(नाटक- झेप), चिन्मय करमळकर (नाटक- सावधान कोर्ट चालू आहे), अनिष देशपांडे (नाटक- एका झाडाची गोष्ट).
 दरम्यान कोल्हापूर केंद्रांतर्गत या स्पर्धेत एकूण ४० नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमती सुषमा मोरे,  अरविंद बेलवलकर आणि  सुरेश बारसे यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.