+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule14 Jan 23 person by visibility 941 categoryशैक्षणिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या कुलपती नियुक्त सदस्य म्हणून कोल्हापुरातील सिद्धार्थ उदयसिंह शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलपती कार्यालयाकडून शिंदे यांची व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती केल्याचे आदेश निघाले आहेत. सिद्धार्थ शिंदे हे भारतीय किसान संघ कोल्हापूर जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष आहेत. राधानगरी धरणाचे चिफ इंजिनियर पांडुरंग शिंदे यांचे ते पणतू आहेत. मराठीतील ख्यातनाम लेखक आणि स्वामीकार रणजित देसाई यांचे ते नातू आहेत.
 कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडून शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. कुलपती कार्यालयाकडून व्यवस्थापन परिषदेवर एका सदस्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिद्धार्थ शिंदे हे गेली अनेक वर्ष शेती शेतकरी आणि शाश्वत विकास या तीन घटकावर काम करत आहेत. याशिवाय जागतिक तापमान वाढ यासंबंधी त्यांचा अभ्यास आहे. शिंदे ऑटोमोबाईल इंजिनिअर आहेत. त्यांनी,  डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.तर युनायटेड किंगडम येथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. ऑटोमोबाईल इंजिनिअरमध्ये एमएस केले.
यानंतरमहिंद्रा रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये प्रोडक्शन विभागात त्यांनी काही काळ मोठ्या पदावर काम केले. त्यानंतर 2009 पासून शाश्वत विकास यावर काम करण्यास सुरुवात केली. शेती आणि शेतकरी या दोन घटकावर त्यांचा फोकस आहे. 2020 मध्ये कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर त्यांनी काही काळ स्वतःचे हॉटेल कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी (क्वारंटाईन) दिले होते.
कुलपती कार्यालयाकडून व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती केल्यानंतर संवाद साधला असता सिद्धार्थ शिंदे म्हणाले, " राज्यपाल तथा कुलपतींनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची मोठी जबाबदारी सोपविले आहे. न्याय देण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. व्यवस्थापन परिषदेवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल कुलपतींचे आभार मानतो."