महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विवेकानंद कॉलेजमध्ये बी. ए. भाग एकमध्ये शिकत असलेला शुभम संजय जाधव याची सेकंड हॉकी इंडिया वेस्ट झोन चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी छत्तीसगड येथे २१ ते २८ जुलै २०२४ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या निवड चाचणी मध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्हयातून आलेल्या 80 खेळाडूमधून त्याची निवड झालेली आहे. शुभम जाधव याला प्रशिक्षक सागर जाधव, योगेश देशपांडे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल त्याचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे , विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आर.बी.जोग यांनी शुभेच्छा दिल्या.या खेळाडूला जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा संतोष कुंडले, प्रा समिर पठाण, प्रा.प्रशांत कांबळे, सुरेश चरापले यांचे प्रोत्साहन मिळाले.