+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपुराचे पाणी कोल्हापूर शहरात ! पूरस्थितीबाबत मुख्यमंत्र्याची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा !! adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule29 Feb 24 person by visibility 176 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळाने बालगोपाल तालीम मंडळाचा २-० असा पराभव करून के.एम.चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.खंडोबा तालीम मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
शिवाजी आणि बालगोपाल या दोन्ही संघांनी उत्कृष्ट शॉर्टपासिंगचा खेळ केला. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला शिवाजीला गोल करण्याची संधी मिळाली. त्यांच्या संदेश कासार याला बालगोपालच्या ओंकार खोत यांनी रोखल्याने पंचानी पेनल्टी बहाल केली पण करण चव्हाण बंदरे याने मारलेली पेनल्टी गोरक्षक निखिल खन्नाने उत्कृष्टरित्या रोखल्याने शिवाजी संघाने गोल करण्याची संधी गमावली.‌ विसाव्या मिनिटाला शिवाजीच्या संदेश कासारने मैदानी गोल करत सामन्यात आघाडी घेतली.
 बरोबरी साधण्यासाठी बालगोपालने जोरदार प्रयत्न केले. रोहित कुरणे, अक्षय मंडलिक, राकेश सिंग यांच्या चढाया शिवाजीच्या बचाव फळीने रोखल्या. मध्यंतरात शिवाजी तरुण मंडळ १-० गोल फरकाने आघाडीवर होता.उत्तरार्धात दोन्ही संघांनी गोल नोंदवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. शिवाजीकडून करण चव्हाण बंदरे, संकेत साळोखे, राजा अली, संदेश कासार यांनी खोलवर चढाया केल्या.
 ७२ व्या मिनिटाला संकेत साळोखे याने मारलेला फटका गोल क्षक निखिल खन्ना यांच्या हातातून सुटल्यानंतर सिद्धेश साळोखेने गोल केला. दोन गोलची भक्कम आघाडी कायम ठेवत शिवाजीने सामना जिंकून स्पर्धेच्या अंतिम करीत प्रवेश केला. शिवाजीच्या इंद्रजीत चौगुले याची सामनावीर तर बालगोपालच्या ओंकार खोत याची निवड झाली.
शुक्रवारचा सामना
खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स, दुपारी चार वाजता.