महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
साहित्यिक, विचारवंत प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या नागरी सत्कार समारंभाच्या निमित्ताने त्यांचे जीवन व कार्य याविषयी विविध शाळा, कॉलेजमध्ये व्याख्याने, चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ते ३० सप्टेंबर या कालावधीत दहा ठिकाणी परिसंवाद-चर्चासत्रे होणार आहेत.
कुरूकली येथील भोगावती कॉलेज येथे २२ सप्टेंबर रोजी या उपक्रमाची सुुरुवात होईल. त्यानंतर दहा दिवस कागल येथील वाय. डी. माने कॉलेज, हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज, रूकडी येथील रा. शाहू कॉलेज, कोल्हापुरातील महावीर, शहाजी कॉलेज तसेच माझी शाळा, चिंचवाड हायस्कूल येथे विविध वक्ते डॉ. लवटे यांच्याविषयी माहिती देणार आहेत.
या उपक्रमात विश्वास सुतार, डॉ.जी.पी. माळी, शिरीष शितोळे, प्रविण चौगले, डॉ. बी. एम. हिर्डेकर, रफिक सुरज, विनोद कांबळे, कृष्णात खोत, प्राचार्य राजेखान शानेदिवाण, प्रकाश कांबळे चंद्रकांत निकाडे व संजय कळके हे वक्ते सहभागी होणार आहेत. या उपक्रमात चिल्लर पार्टी व बालकुमार साहित्य सभा या संस्थाही सहभागी होणार आहेत.
....................