+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule03 Jul 24 person by visibility 155 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : सवलत योजनेमध्ये थकीत भाडे भरलेले नाही अशा पाच गाळेधारकांचे गाळे  महापालिकेच्या इस्टेट विभागामार्फत सील करण्यात आले. महानगरपालिका मालकीच्या ए, बी, सी, डी व ई वॉर्ड च्या विविध मार्केटमधील स२०१५-१९ व सन२०१९-२४ या वर्षातील भाडे दंड/व्याजामध्ये सवलत योजना राबवून भाडे भरून घेण्याची कार्यवाही चौदा जूनपर्यंत सुरू होती. या सवलत योजनेमध्ये १३९२ भाडे करार मुदत संपलेल्या गाळेधारकांपैकी ५०८ गाळेधारकांनी थकीत भाडे भरून दंड/व्याजावरील सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. परंतू ज्या गाळेधारकांनी सवलत योजनेमध्ये थकीत भाडे भरलेले नाही अशा गाळेधारकांचे गाळे  सील करण्याची मोहिम राबविण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी मार्केट मधील पाच गाळे सील करण्यात आले.
 प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व उपायुक्त साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, सहायक अधिक्षक मकरंद जोशी, कनिष्ठ लिपीक गिरीश नलवडे, कल्पना शिरदवाडे, आकाश शिंदे, विष्णू चित्रुक व सदानंद फाळके यांनी भाग घेतला.
 यापुढेही कारवाई सुरू राहणार आहे. थकबाकीदार गाळेधारकांनी आपली थकबाकी त्वरीत महापालिकेकडे भरून सहकार्य करावे व सील सारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन इस्टेट विभागाने केले आहे.