+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule19 Jul 24 person by visibility 150 categoryक्रीडा
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: सुब्रतो मुखर्जी विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेमध्ये 15 वयोगट मुलांच्या गटात संजीवन विद्यालयाने तर 17 वयोगटात महाराष्ट्र हायस्कूल ने विजेतेपद पटकावला 17 वयोगट मुलींच्या गटात काळ सिद्धेश्वर विद्यालयाने विजेते पटकावले वारणा येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी च्या मैदानावर झालेल्या स्पर्धेचे संयोजन जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले.
 १५ वर्ष मुलांच्या अंतिम सामन्यात संजीवन विद्यालय पन्हाळा संघाने महाराष्ट्र हायस्कूल संघांचा टायब्रेकर वर 3-1 ने अशा गोल फलकाने पराभव करत विजेतेपद पटकावले पूर्ण वेळेत सामना शून्य गोल बरोबरीत होता.
संजीवन विद्यालय पन्हाळा संघात समानता सागोलसेम, मनीमतुम थोनाजम, लाचिंबा यनंद्रेबम, आकशासिंग इलेंगबम, परिटन थोकचोम, आबिनाश हुईद्रॉम, मनीचंद्रा शागोल्सेम, नरेश सोरम, आदिराज जाधव, परफेक नींगथोजम, थैयथोईबा मयेंगबम, कौरंगबा लैठांगाबाम, सिन्हईबा नोगथोंबाम, निशांत जाधव या खेळाडूंचा समावेश होता. संघाला क्रीडा शिक्षक जयंत कुलकर्णी अमित साळोखे यांचे मार्गदर्शन लाभले.
१७  वर्ष मुलींच्या गटात श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल कणेरी संघाने श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल फलटण संघावर 4-0 असा विजय मिळवला. काडसिद्धेश्वर कडून आदिती ढेरेने दोन ,संध्याराणी जानवेकर आणि यशस्वी बेनाडीने प्रत्येकी एक गोल केला.
 काडसिधेश्वर हायस्कूल संघांत आसावरी पाटील ,समीक्षा मेंगाने, सिद्धी सूर्यवंशी, निकिता साळोखे, जानवी ढेरे, संध्याराणी जाणवेकर, साधना खाडे, प्रांजली कांबळे ,आदिती ढेरे ,यशस्वी बेनाडी, लक्ष्मी मेंगाने, समृद्धी ढेरे ,स्वरूपा पाटील, सिद्धी हवालदार, सई बोंडगे यांचा समावेश होता. संघाला क्रीडा शिक्षक अमित शिंत्रे, शैलेश देवणे यांचे मार्गदर्शन लाभले. 
१७  वर्ष मुलांच्या गटात अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने संजीवन विद्यानिकेतन, पन्हाळा संघाला 3-1 अशा फरकाने पराभूत करत अजिंक्यपद पटकावले.महाराष्ट्र हायस्कूल कडून आदित्य पाटील, कार्तिक निकम, ईशान तीवले प्रत्येकी एक गोल केला .संजीवन कडून एकमेव गोल प्रथमेश लोंढेने केला.
 महाराष्ट्र हायस्कूल संघांत ईशान हिरेमठ, रोनित जांभळे, मुदस्सर शेख ,प्रतीक पाटील, सर्वेश गवळी, शुभम कांबळे, केविन गोंसालविस, आयुष शिंदे, कार्तिक निकम, स्वरूप बागडेकर, हर्षवर्धन पाटील, शुभम पाटील, आदित्य पाटील, तन्मय घोरपडे, मयूर सुतार, ईशान तिवले यांचा समावेश होता. क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, व्ही एस पाटील, संतोष पोवार, सुर्याजित घोरपडे, शरद मेढे, सूर्यदिप माने यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. स्पर्धेत अजिंक्य गुजर, अवधूत गायकवाड, पंकज राऊत, गौरव माने, शरद शिर्के, गजानन मनगुतकर , योगेश हिरेमठ, निरंजन कामते, ऋषी दाभोळे ,रोहित मंडलिक, अभिजित गायकवाड, राहुल तिवले यांनी पंच म्हणून काम पाहिले.