+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान
1001130166
1000995296
schedule12 Jul 24 person by visibility 291 categoryलाइफस्टाइल
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी अरूंधती महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी आणि सचिवपदी बी एस शिंपुकडे यांची निवड झाली. नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा, गुरूवारी एका शानदार समारंभात झाला. दरम्यान रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं, गरजू महिला, ज्येष्ठ नागरीक, युवती यांच्यासह समाजातील सर्वच घटकांसाठी काम होईल, असे नूतन अध्यक्षा महाडिक यांनी नमुद केले.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या खजानिसपदी अनिरूध्द तगारे तर जॉईंट सेक्रेटरी पदावर भारती नायक यांची निवड झाली. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभासाठी इन्स्टॉलिंग ऑफीसर म्हणून, रोटरी पुण्याच्या माजी प्रांतपाल मंजु फडके यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांचीही प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्यासाठी, अरूंधती महाडिक यांना रोटरीचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यातून समाजातील अनेक अडीअडचणी दूर होतील, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. क्लबच्या समाजोपयोगी उपक्रमांना आवश्यक  मदत मिळवून देवू, अशी त्यांनी ग्वाही दिली. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनसाठी, खासदार महाडिक यांनी १० हजार अमेरिकन डॉलर मदत निधी जाहीर केला. नतन अध्यक्षा महाडिक यांनी सर्व सदस्य आणि पदाधिकार्‍यांना सोबत घेवून, नवनवीन प्रकल्प राबवले जातील. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे सुवर्ण महोत्सवी वर्ष संस्मरणीय ठरेल, असे काम करणार असल्याचे सांगितले. दरम्यान सुवर्ण महोत्सवी वर्षातील नवीन कार्यकारिणीची घोषणा महाडिक यांनी केली. रोटरीच्या उपप्रांतपाल गौरी शिरगावकर, माजी प्रांतपाल संग्राम पाटील, माजी अध्यक्ष शरद पाटील, सेक्रेटरी रितू वायचळ, अरविंद कृष्णन यांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली. पदग्रहण सोहळ्याला नासिर बोरसदवाला, डॉ. दिपक जोशी, सचिन माने, ऋषिकेश जाधव, सचिन लाड, राहूल पाटील, दिग्वीजय पाटील, योगेश आडसुळे, विकास राऊत, अनिकेत अष्टेकर, पृथ्वीराज महाडिक, विश्‍वराज महाडिक, कृष्णराज महाडिक वैष्णवी महाडिक, मंजिरी महाडिक उपस्थित होते.