रविवारी मैत्रीदिनानिमित्त राजेश यूथ फेस्टिव्हल
schedule03 Aug 24 person by visibility 276 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मैत्री दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने युवा सेना कोल्हापूर आणि नो मर्सी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने “राजेश युथ फेस्टिव्हल” चे रविवारी, चार ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत “मेरी वेदर ग्राउंड, नागाळा पार्क, कोल्हापूर” येथे आयोजन करण्यात आले आहे
. यामध्ये कलाकृती चित्रकला स्पर्धा, सौंदर्य स्पर्धेसह डीजे पार्टी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासह विशेषतः उपस्थित युवा वर्गास निर्व्यसनी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्याचा संकल्प दिला जाणार असल्याची माहिती युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांनी दिली आहे.
या फेस्टीव्हल अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ ४ रोजी मेरी वेदर मैदान येथे सायंकाळी होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमात पार पडणार आहे. सायंकाळी ५ वाजता फेस्टीव्हलची सुरवात होणार आहे. यावेळी युवा वर्गा साठी डीजे पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता मेरी वेदर मैदान येथे मंडप उभारला आहे. राजेश युथ फेस्टिव्हल अंतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांत युवा वर्गाने सहभागी व्हावे असे आवाहन युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांनी केले आहे.