+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule22 Jul 24 person by visibility 381 categoryराजकीय
संचालक मंडळ बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी राजेश पांडुरंग पाटील यांची एकमताने निवड झाली. बँकेचे संचालक व आमदार कै.  पी. एन. पाटील यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर एकमेव राजेश पाटील यांचा अर्ज आल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. संचालक मंडळाच्यावतीने  पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी त्यांचा सत्कार केला.      
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा, विकास सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्था तालुका करवीर या प्रवर्गातील रिक्त झालेल्या जागेवर संचालक म्हणून पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सूचक म्हणून मंत्री  मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी अनुमोदन दिले. निवडणूक  अधिकारी म्हणून सहकारी संस्था उपनिबंधक नीलकंठ करे यांनी काम पाहिले.
      पालकमंत्री  मुश्रीफ म्हणाले, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी सलग ४० वर्षे बँकेचे संचालक म्हणून काम केले. बँकेच्या प्रत्येक बैठकीला जातीनिशी उपस्थित असायचे. त्यांनी सदैव बँकेच्या आणि शेतकरी हितालाच प्राधान्य दिले. सभागृहाच्या ईशान्य कोपऱ्यातील त्यांची खुर्ची ठरलेलीच असायची. गेल्या तीन बैठका ही खुर्ची रिक्त होती. आज तीमध्ये त्यांचे सुपुत्र राजेश पाटील बसले. 
   आमदार सतेज उश पाटील म्हणाले, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा सहकार- समृद्धीचा आणि शेतकरी हिताचा वारसा त्यांचे सुपुत्र राजेश पाटील सक्षमपणे पुढे चालवतील. 
    राजेश पाटील म्हणाले, वडील दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा शेतकरी कल्याणचा वारसा जिल्हा बँकेच्या माध्यमातून मी मनापासून पुढे चालवीन.      
यावेळी उपाध्यक्ष आमदार राजू आवळे, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, ए. वाय. पाटील, प्रताप  माने, बाबासाहेब पाटील - आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने,  श्रुतिका काटकर, स्मिता गवळी आदी संचालक उपस्थित होते.
...............