+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule26 Jul 24 person by visibility 316 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सकाळी काही वेळ उघडीप दिल्यानंतर दुपारनंतर पुन्हा पावसाचा रपाटा सुरू झाला. सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग मोठया प्रमाणात होत असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीची वाढ कायम आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी ४५ फूट ११ इंचापर्यंत पोहचली आहे. ९४ बंधारे पाण्याखाली आहेत. शाहूपुरीतील कुंभार गल्ली, सुतामळा, व्हिनस कॉर्नर परिसर, बापट कॅम्प, कदमवाडी, लक्षतीर्थ वसाहत, पंचगंगा तालीम परिसर,रमणमळा परिसर, उलपे मळा, कदमवाडी, मुक्तसैनिक वसाहत, तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टी परिसराला पुराच्या पाण्याचा फटका बसत आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांनी स्थलांतर सुरू केले आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे एक पथक दाखल झाले आहे. आणखी एक पथक शनिवारी (२७ जुलै ) दाखल होत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन नागरिकांना धीर दिला. जिल्ह्यातील विविध भागात २५० हून अधिक घरांची पडझड झाली असून यामध्ये नुकसानीचा आकडा एक कोटीपर्यंत पोहचला आहे. ग्रामीण भागात जनावरेही सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहेत.
कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी येथील उपसा केंद्र परिसरात पाणी पोहोचल्याने ही उपसा केंद्रे बंद ठेवण्यात आली. उपसा केंद्रे बंद ठेवल्याने कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले आहेत. चार दरवाजे आणि पॉवर हाऊस मिळून ७२१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यामध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. शहरातील विविध भाग पुराच्या पाण्यानी बाधित झाला आहे. पूरबाधित क्षेत्रातील पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, शाहूपुरी, बापट कॅम्प या परिसरातील २२८ नागरीकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. यामध्ये ५६ कुटुंबातील ११६ पुरुष, ११२ महिला व ४१ मुलांचा समावेश आहे. शहरातील काही भागात घरांची पडझड झाली आहे. झाडे पडल्याने काही ठिकाणी वाहतूक रोखली होती.
 दरम्यान उद्यान विभाग व अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. रेसकोर्स नाका, प्रतिभानग, रुईकर कॉलनी, पुईखडी, साळोखेनगर, राजारामपुरी पाचवी व दहावी गल्ली, जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरात झाडे पडली होती. पडले असून ते उद्यान व अग्निशमन विभागाच्यावतीने कटींग करुन रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. मंगळवारपेठ येथील शिंदे गल्लीतील एका घराची भिंत व डी वॉर्ड येथील भुसार गल्लीतील पडक्या घराची भिंत पडली आहे.