राहुल गांधी यांचा पाच ऑक्टोबरचा सुधारित दौरा
schedule04 Oct 24 person by visibility 246 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे शनिवारी (पाच ऑक्टोबर २०२४) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटाला त्यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होणार आहे. विमानतळावरुन ते हॉटेल सयाजीकडे रवाना होतील. सकाळी दहा वाजता कसबा बावडा येथील भगवा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे त्यांचे हस्ते अनावरण आहे. पुतळा अनावरणानंतर सकाळी अकरा वाजता ते टाऊन हॉल येथील राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळास भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी बारा वाजता हॉटेल सयाजी येथे आयोजित संविधान सन्मान संमेलनास उपस्थित राहणार आहेत. दुपारी एक वाजता ते हॉटेल सयाजी येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण होतील.