+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule24 Jul 24 person by visibility 140 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :“ विवेक वार्षिक नियतकालिक हे महाविद्यालयाचा आरसा आहे. महाविद्यालयाच्या विविध विभागाचे प्रतिबिंब त्यामध्ये दिसते. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लेखन कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम विवेक नियतकालिक करीत असते. ”असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी काढले.
येथील विवेकानंद कॉलेजच्या विवेक २०२३-२४ या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन झाले. या  समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कार्याध्यक्ष साळुंखे बोलत होते.  विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
 “शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेत सातत्याने विवेक नियतकालिक अग्रक्रमावर राहिले आहे. दरवर्षी विवेक अंकाची निर्मिती साहित्य, फोटोग्राफी , कलात्मक मांडणी यामुळे दर्जेदार असते. याही वर्षी विवेक या अंकाची निर्मिती दर्जेदार झालेली आहे.”अशा शब्दांत कौतुक साळुंखे यांनी केले. 
या विवेक अंकाचे प्रमुख संपादक डॉ. एकनाथ आळवेकर हे होते. विभागीय संपादक म्हणून डॉ.कविता तिवडे, डॉ.आरिफ महात, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. टेकचंद गौपाले, डॉ.सलमा नदाफ, प्रा अशोक पाटील, प्रा एस एस जगताप, प्रा विश्वंभर कुलकर्णी, प्रा एस एस कुंडले, प्रा. राहुल इंगवले यांनी काम पाहिले. या अंकाच्या निर्मितीसाठी ज्युनिअर, सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार  आर. बी. जोग यांचे सहकार्य लाभले.