+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule16 Jul 24 person by visibility 126 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुणे येथे झालेल्या २७ वी कॅप्टन इझॅकियल शूटिंग चॅम्पियनशीप राज्यस्तरीय  स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज महाडिक यांनी डबल ट्रॅप शूटिंग प्रकारात ब्रॉंझ पदकाला गवसणी घातली. या कामगिरीमुळे त्यांची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत निवड झालीय.
चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय शूटिंग चॅम्पियन स्पर्धेत, डबल ट्रिप या प्रकारात यश प्राप्त केले आहे. नेमबाजी खेळातील, डबल ट्रॅप प्रकारात आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत, त्यांनी ब्रांझ पदक पटकावले. आता पृथ्वीराज महाडिक यांची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पृथ्वीराज महाडिक यांना सिद्धार्थ पवार, तेजस कुसाळे, अब्दुल मिरशिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरुंधती महाडिक यांच्या प्रोत्साहनातून, पृथ्वीराज महाडिक यांनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात अनेक क्रीडा प्रकारांमध्ये अव्वल यश मिळवले आहे. गेल्या काही वर्षात नेमबाजी खेळाच्या सरावात खंड पडला होता. मात्र आत्मविश्‍वास आणि जिद्दीने नेमबाजी स्पर्धेत सहभागी होवून, त्यांनी हे यश मिळवले आहे.