+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Sep 22 person by visibility 334 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
“गर्भधारणेपूर्वी महिलांनी योग्य खबरदारी घेतली तर नवजात शिशूंमध्ये जन्मजात मेंदूशी संबंधीत आजार टाळता येतात,” असे प्रतिपादन बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांनी केले.
जम्मू काश्मिरची राजधानी श्रीनगरमध्ये नुकतीच जन्मजात बालरुग्ण मेंदू तज्ज्ञांची राष्ट्रीय स्तरावरील परिषद पार पडली. या परिसंवादात यामध्ये गेल्या ३८ वर्षाहून अधिककाळ नवजात शिशूंचे विविध आजार आणि प्री मॅच्युअर शिशूंवर विशेष अभ्यास असणारे डॉ. संघवी यांचे बीज भाषण झाले. यावेळी बोलताना डॉ. प्रकाश संघवी यांनी, गर्भधारणेपूर्वी तीन महिने अगोदर तसेच प्रसुती होईपर्यंतही मातांनी फॉलिक ऍसिड या गोळ्यांचं सेवन करून योग्य खबरदारी घेतली तर नवजात शिशूंमधील जन्मजात मेंदूशी संबंधीत आजार टाळता येतात. फॉलिक ऍसिड या गोळीची किंमत अगदी नाममात्र म्हणजे २५ पैसे ते ३ रूपये इतकी आहे.”असे नमूद केले.
‘जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार नवजात शिशूंमध्ये जन्मजात मेंदूशी संबंधीत आजार उद्भवण्याचे प्रमाण केवळ तीन टक्के आहे. हे प्रमाण अत्यल्प दिसत असले तरी, जन्मजात मेंदूशी संबंधीत आजाराचे बालक जन्माला आल्यास, त्या बालकाला आणि त्याच्या कुटूंबियांनाही अनेक समस्यांना आयुष्यभर तोंड द्यावे लागते.”
“नवजात शिशूंमध्ये रक्तातील साखर कमी होणे, ऑक्सिजन, कॅल्शियम, व्हीटॅमिनची कमतरता, जंतू संसर्ग या आजाराचे लवकर निदान होवून, त्यावर वेळीच औषधोपचार केल्यास हे आजार सुध्दा प्रामुख्याने आढळतात. हे सर्व आजार सुद्धा मातांनी गरोदरपणात योग्य खबरदारी आणि काळजी घेतली तर टाळता येतात’असेही डी. संघवी यांनी स्पष्ट केले. या परिषदेत देशभरातील ७०० बालरोगतज्ज्ञ सहभागी झाले होते.