+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआर के पोवार यांना पत्नीशोक adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Mar 24 person by visibility 153 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
 महानगरपालिकांमध्ये प्रभाग सदस्य संख्या तीन वरून चार करण्याविषयीचे महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक - २०२४ हे प्रशासकीयदृष्ट्या अव्यवहार्य आहे. यामुळे विकासकामांना खीळ बसून नगरपालिका-महानगरपालिकांचे नुकसान होणार आहे. तसेच जनतेच्या समस्या सोडविण्याचे दायित्व नेमके कोणाचे हा प्रश्न उपस्थित होऊन सामान्य जनतेला त्रास होणार आहे . त्यामुळे हे विधेयक घाई-गडबडीत मंजूर न करता सर्वंकष चर्चा करून याबाबत निर्णय घ्यावा, केवळ राजकारणासाठी चारची वार्ड रचना नको,असे मत विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
   विधान परिषदेमध्ये सोमवारी मुंबई महानगरपालिका वगळता इतर महानगरपालिकांमध्ये प्रभाग सदस्य संख्या 3 वरून 4 करण्याविषयी महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक - 2024 मांडण्यात आले. यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी याबाबत राजकीय दृष्ट्या निर्णय न घेता प्रशासकीय दृष्ट्या ठामपणे निर्णय घेणे गरजेचे असल्यचे सांगितले.
 महापालिका, नगरपालिकांबाबत राजकीय दृष्ट्या आम्ही किती वर्ष खेळ करणार आहोत हा निर्णय आपण सर्वांनी घेणे गरजेचे आहे. आत्तापर्यंतच्या व्यवस्थेत एक वॉर्ड निर्णयाप्रमाणे अनेक ठिकाणी कारभार यशस्वीरीत्या चाललेला आहे. 
 हे विधेयक संमत करताना विचारपूर्वक आपण निर्णय घ्यावा. गरज पडली तर अजून चर्चा कराव्यात. केवळ राजकारणासाठी वॉर्ड रचना बदलत राहिलो तर महापालिका, नगरपालिकांचे नुकसान होणार आहे. या नुकसानीला आपण कायदे करणारे जबाबदार ठरू. आपली नोंद इतिहासात या नगरपालिका महापालिकेचे नुकसान करणारे आमदार म्हणून होईल हे लक्षात ठेऊया. आपण चार विधानसभा मतदाररसंघ एकत्र करून निवडणूक लढवू शकतो का ? असा प्रश्नही आमदार पाटील यांनी उपस्थित केला.