वकील पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नारायण भादिंगरे
schedule21 Aug 24 person by visibility 225 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा वकील पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अॅड. नारायण भादिंगरे यांची बिनविरोध निवड झाली. यानिवडीबद्दल जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड सर्जेराव खोत यांच्या हस्ते भादिंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. महादेवराव आडगुळे, रणजित गावडे, शिवाजीराव राणे, प्रशांत शिंदे, आर एल चव्हाण, गिरीश खडके, ए पी पोवार, अजित मोहिते, व्ही. आर पाटील, राजेंद्र मंडलिक, अरुण पाटील, विजयकुमार ताटे-देशमुख, पी. आर भावके, डी. के. पाटील, सोनाली शेठ आदी उपस्थित होते.