मुश्रीफांचा रविवारपासून कार्यक्रमांचा धडाका ! बुधवारी मुख्यमंत्री- दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापुरात !!
schedule05 Oct 24 person by visibility 1123 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून होत असलेल्या विविध विकास कामांच्या शुभारंभ व उद्घाटनाचा धडाका रविवार ते गुरुवार या कालावधीत होत आहे.
६ ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या होत आहे.
सोमवार ७ ऑक्टोंबर रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दुपारी ४ वाजता देशातील पहिल्या शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय तसेच हॉस्पिटलचा भूमिपूजन, कोनशीला अनावरण उत्तूरमध्ये होणार आहे. सायंकाळी पाच वाजता पदवी प्रवेश कार्यक्रम बहिरेवाडी येथील जे. पी. नाईक हॉलमध्ये होत आहे. तसेच; सायंकाळी ६ वाजता उत्तुर येथील उत्तुर- धामणे रोडवरील एसटी स्टँड बांधकाम व तलाव सुशोभीकरण शुभारंभ व येथील नेहरू चौकात जाहीर सभा होणार आहे.
बुधवार ९ ऑक्टोंबर रोजी कोल्हापूर येथील शेंडा पार्कमधील ११०० बेडचे हॉस्पिटल तसेच येथील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होत आहे. तसेच तपोवन मैदानावर जाहीर सभा होणार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन होणार आहे.
गुरुवारी १० ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मौजे सांगाव येथील नवोदय विद्यालय शेजारी ग्रामीण सेंटर १०० बेडच्या हॉस्पिटलच्या कामाचा भूमिपूजन, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय शुभारंभ नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती माधुरीताई कानिटकर यांच्या हस्ते होत आहे. सायंकाळी सात वाजता मौजे सांगाव येथील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
===========