भाजपतर्फे स्वदेशी जागरचे मार्केटिंग ! प्रत्येक घरी स्वदेशी-घरोघरी स्वदेशी !!
schedule24 Sep 25 person by visibility 171 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी वस्तू वापरा असा संकल्प व्यापा-यांपर्यंत पोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने अभियान सुरू केले आहे. त्या अनुषंगाने, महाद्वार रोड परिसरातील व्यापाऱ्यांना आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवा असे आवाहन केले. खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी महाद्वार परिसरातील दुकानांमध्ये जाऊन व्यापारांना प्रत्येक्ष भेटून स्वदेशी अभियानाचा संकल्प सांगितला.
जीएसटी कपातीमुळे झाली मोठी बचत, प्रत्येक घरी स्वदेशी-घरोघरी स्वदेशी अशा आशयाचे फलक दुकान मालकांना दिले. त्याचबरोबर ग्राहकांना देखील स्वदेशी वस्तू खरेदी करण्याची विनंती करण्यात आली. भाजपा नेत्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, मोदिजींचा संकल्प यशस्वी करण्याची ग्वाही व्यापारांनी दिली. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, केंद्र सरकारने चार दिवसांपूर्वी घेतलेल्या जीएसटी कर कपातीच्या निर्णयामुळे यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव सर्व घटकांसाठी बचतोत्स्व ठरला आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.’
या अभियानमध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, अशोक देसाई, विराज चिखलीकर, राजू मोरे, धनश्री तोडकर, हेमंत आराध्ये, विजय अग्रवाल, शैलेश पाटील, गिरीश साळोखे, विजय खाडे, डॉ राजवर्धन, संतोष भिवटे, राजसिंह शेळके, संगीता खाडे, गणेश देसाई, माधुरी नकाते, किरण नकाते, भरत काळे, हेमंत कांदेकर, अतुल चव्हाण, दिग्विजय कालेकर, विश्वजीत पवार, सयाजी आळवेकर, आशिष ढवळे, सुभाष रामुगडे, अमोल पालोजी, दिलीप पोवार, अवधूत भाटे, अभिषेक बोंद्रे, संतोष माळी, महेश यादव, अशोक लोहार, विशाल शिराळकर, रविकिरण गवळी, राजगणेश पोळ, विनय खोपडे, रहीम सनदी, अनिल कामत आदी उपस्थित होते.