बिद्री कारखान्याच्या संचालकपदी मनोज फराकटे
schedule02 Oct 24 person by visibility 135 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज गणपतराव फराकटे यांची निवड करण्यात आली. प्रादेशिक (साखर) उपसंचालक जी. जी. मावळे यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा झाली.कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचे २४ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यामुळे रिक्त पद भरण्यासाठी संचालक मंडळाची बैठक झाली. संचालक पदासाठी फराकटे यांचे नाव संचालक सुनील सुर्यवंशी यांनी सुचविले. संचालक रणजित मुडुकशिवाले यांनी अनुमोदन दिले.