+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule05 Jul 24 person by visibility 135 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महावितरण कोल्ऱ्हापूर परिमंडलच्या मुख्य अभियंता स्वप्निल काटकर व अधीक्षक अभियंता जी. एम लटपटे यांचा स्मॅक, केईए, गोशिमा आणि मॅक या औद्योगिक असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. 
यावेळी स्मॅकचे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी या सर्व औद्योगिक संघटनांबद्दल तसेच औद्योगिक क्षेत्रामधील कामकाजाबाबत माहिती दिली. महाराष्ट्रात एमएसएमईचा‌ सध्याचा सर्वात मोठा गड कोल्हापूर विभाग आहे. येथे सर्वाधिक उद्योगधंदे आहेत यामध्ये फाउंड्री आणि इंजिनिअरिंग, वस्त्रोद्योग व इतर उद्योगांचा समावेश आहे. कोल्हापूरा मधील स्थानिक उद्योजक येथे कार्यरत आहेत, या सर्वांनी स्वकष्टावर प्रगती साधत उद्योगांना मोठे केले असे ते म्हणाले.
 महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल मध्ये वीज गळतीचे प्रमाण फार कमी आहे तसेच वीज देयक ही वेळेवर अदा केली जातात, महावितरण कडून सुद्धा उद्योग क्षेत्राला नेहमीच सहकार्याची भूमिका असते याबद्दल जैन यांनी महावितरणचे कौतुक केले. 
उद्यमनगरमध्ये अंडरग्राउंड वायरिंग करणेचे काम अद्यापी प्रलंबीत आहे तसेच शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये मोबाईल व्हॅन ची सुविधा बंद आहे या दोन्ही बाबतीत मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत  व्यवस्था करण्याची ग्वाही दिली.
महावितरणच्या या नवनियुक्त अधिकाऱ्यांनी या चारही औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले. याप्रसंगी बाबासो कोंडेकर, कमलाकांत कुलकर्णी, नितीनचंद्र दळवाई, राजू पाटील, अतुल पाटील, संजय देशिंगे, कार्यकारी अभियंता शहर सुनिल माने [शहर], कार्यकारी अभियंता अभिजीत सिकणीस [प्रशासन], प्रदीप व्हरांबळे, कृष्णात सावंत  उपस्थित होते.