+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule11 Jul 24 person by visibility 369 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र हायस्कूलने शांतिनिकेतन स्कूलवर पाच विरुद्ध दोन गोलने विजय मिळवत सुब्रतो मुखर्जी शहरस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत 17 वयोगटात अजिंक्य पटकावले. विभागीय क्रीडा संकुलाच्या फुटबॉल मैदानावर अंतिम सामना खेळवण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने स्पर्धेचे आयोजन केले होते. 
अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने शांतिनिकेतन स्कूलचा 5-0 असा पराभव केला. महाराष्ट्र हायस्कूलकडून कार्तिक निकमने दोन, मयूर सुतार ईशान तिवले हर्षवर्धन पाटीलने प्रत्येकी एक गोल केला.
तृतीय क्रमांकाच्या सामन्यात पोद्दार स्कूलनै छ. शाहू विद्यालय सीबीएसईने 5-2 असा पराभव केला.पोद्दारकडून हसनैन अन्सारीने तीन, आर्यन खोत, प्रेम राऊतने प्रत्येकी एक गोल तर शाहू विद्यालय कडून आदर्श नाळे प्रसन्न इंगळे एक गोल केला.
विजयी महाराष्ट्र हायस्कूल संघ असा, ईशान हिरेमठ, रोहित जांभळे, मुदस्सर शेख, प्रतीक पाटील, सर्वेश गवळी, शुभम कांबळे, केविन गोंसालविस, आयुष शिंदे, कार्तिक निकम, स्वरूप बागडेकर, हर्षवर्धन पाटील, शुभम पाटील, आदित्य पाटील, तन्मय घोरपडे , क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, व्ही एस पाटील, मार्गदर्शक संतोष पोवार, सुर्याजित घोरपडे ,शरद मेढे, सूर्यदिप माने.
बक्षीस समारंभ श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग चेअरमन के. जी. पाटील, संचालक विनय पाटील, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, प्राथमिक शिक्षण समिती शैक्षणीक पर्यवेक्षक विजय माळी, महाराष्ट्र हायस्कूल मुख्याध्यापक एस. एन. इनामदार, पर्यवेक्षक एस. ए. जाधव, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन सचिव प्रदीप साळोखे, क्रीडा शिक्षक सुरेश चव्हाण, सामजिक कार्यकर्ते आशिष मांडवकर यांच्या उपस्थितीत झाला.
स्पर्धेत पंच म्हणून अवधूत गायकवाड, पंकज राऊत, गौरव माने, शरद शिर्के, गजानन मनगुतकर , योगेश हिरेमठ, सागर मेढे, सिद्धी शेळके, निरंजन कामते, ऋषी दाभोळे यांनी काम पाहिले.