+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule25 Jul 24 person by visibility 119 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या रिक्त झालेल्या संचालक मंडळातील सर्वसाधारण गटातून महादेव भैरू डावरे यांची बिनविरोध निवड झाली .  जिल्हा सहाय्यक निबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा ठाकरे यांच्या  अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली.  पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक पार पडली.*
 सर्वसाधारण गटातील संचालक  शिवाजी वसंत भोसले हे सेवानिवृत्त झाले. यामुळे एक संचालक पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या पदासाठी सहकार खात्याच्या नियमानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली. एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने महादेव भैरू डावरे हे नूतन संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले. डावरे यांचे नाव साताप्पा कासार यांनी सुचविले त्यास अमित परीट यांनी अनुमोदन दिले.
 चेअरमन सूर्यकांत बरगे यांनी संस्थापक भरत रसाळे यांनी पारदर्शक व काटकसरीने कारभार करून संस्थेला दैदीप्यमान असे यश मिळवून दिल्याचे सांगितले. यापुढेही पतसंस्थेचा नावलौकिक वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी संस्थापक संचालक शिवाजी भोसले, संचालक मच्छिंद्र नाळे, शिवाजी सोनाळकर, कृष्णात चौगले , वर्षाराणी वायदंडे यांची अभिनंदनपर भाषणे झाली. यावेळी व्हाईस  चेअरमन सर्जेराव नाईक, संचालक वसंत पाटील, रोहिणी येडगे, राजेश कोंडेकर, संतोष आयरे, राजेंद्र कोरे, संस्थापक संचालक शिवाजी भोसले, सल्लागार समिती सदस्य दशरथ कांबळे , चंद्रकांत वाकरेकर ,कार्यकारी संचालक सदाशिव साळवी, राजाराम हुल्ले, पांडूरंग गवळी ,संजय पाटील,  अधिकारी निलेश पाटील आदी उपस्थित होते.