+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान
1001130166
1000995296
schedule23 Jul 24 person by visibility 3302 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : दर्जेदार शैक्षणिक परंपरा असलेल्या विवेकानंद शिक्षण संस्थेच्या  विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे  शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून एआयसीटीई  मान्यताप्राप्त एमबीए आणि एमसीए  हे पदव्युत्तर पदवी कोर्सेस सुरू होत आहेत. अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी दिली.  दोन्ही कोर्सेस हे शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूरशी संलग्न आहेत. दोन्ही कोर्सेसची प्रवेश क्षमता ६० आहे.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कॉलेजांपैकी एक म्हणून ओळखले जाते. विवेकानंद कॉलेजला नैक "ए" ग्रेड मान्यता प्राप्त आहे आणि युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन (यूजीसी) तर्फे दोन वेळा “कॉलेज विथ पोटेन्शिअल फॉर एक्सलन्स” गौरवण्यात आले आहे. डीबीटी, भारत सरकारच्या "द स्टार कॉलेज" योजनेमध्ये विवेकानंद कॉलेजचा समावेश करण्यात आला आहे.
या शैक्षणिक वर्षापासून एमबीए आणि एमसीए हे दोन पदव्युत्तर पदवी कोर्सेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कोर्सेस मधून फक्त स्किल्ड मॅनेजर्सच नाही तर ओनर्स तयार करण्याचा मानस गावडे यांनी व्यक्त केला. स्टार्टअपसाठी लागणारे पोषक वातावरण हे दोन्ही कोर्सेसमार्फत देण्याचा संस्थेचा हेतू राहील. एमबीए प्रोग्राम अंतर्गत कॉलेज मार्केटिंग, एचआर, बँकिंग अँड फायनान्स, ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट, बिझनेस ॲनॅलिटिक्स स्पेशलायझेशन्स ऑफर करत आहे.
विवेकानंद कॉलेज स्वायत्त्य असल्यामुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ओरिएंटेड अद्यायावत अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध आहे. विवेकानंद कॉलेज तर्फे नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप व जॉबची संधी उपलब्ध आहे. शंभर टक्के प्लेसमेंट सहाय्य देण्याची हमी संस्थेमार्फत देण्यात आली आहे. सर्व सोयीयुक्त सुसज्ज क्लास रूम्स, अत्याधुनिक लैंग्वेज आणि इंटरनेट लॅब उपलब्ध आहे. उच्चशिक्षित अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापकांची टीम एम.बी.ए आणि एम.सी.ए साठी उपलब्ध आहे. कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांसाठी माफक दरात वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. दोन्ही कोर्सेसना राज्य व केंद्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती योजना लागू आहेत. या व्यतिरिक्त श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनातर्फे संस्थास्तरीय डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम मेरीट शिष्यवृत्ती आणि श्री स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. 
 "श्री स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना विवेकानंद कॉलेजच्या एम.बी.ए / एम.सी.ए कोर्ससाठी प्रवेश घेतले नंतर ट्युशन फी मधील रुपये पंधरा हजार (15,000/-) प्रती वर्ष इतके शैक्षणिक शुल्क संपूर्ण शैक्षणिक कालावधीसाठी माफ होणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी संस्थेने सुमारे 20 लाख रुपयांची तरतूद केली आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभय कुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा  शुभांगी गावडे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कौस्तुभ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा" असे आवाहन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केले. पत्रकार परिषदेसाठी संस्थेच्या व्यवसायिक शिक्षण समूहाचे संचालक  वीरेन भिर्डी उपस्थित होते. एमबीए ॲडमिशन संदर्भात प्रा. विराज जाधव 8421955828, एमसीए प्रवेश प्रक्रिया संदर्भात प्रा. विजय पुजारी 8669032554 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.