Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डीवाय पाटील विद्यापीठाचे तीन प्राध्यापक ठरले यंग असोसिएट-फेलोविवेकानंद कॉलेजमध्ये मंगळवारी शिष्यवृत्ती वितरण समारंभमुश्रीफ, आबिटकरांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक, अंबाबाई दर्शन  अन् विकासाची ग्वाहीदोन्ही मंत्र्यांची गोकुळचे चेअरमन डोंगळेंच्या घरी सदिच्छा भेट, कुटुंबियांकडून  सत्कारराजेश क्षीरसागरांच्या अजेंडयावर शहरासाठी टॉपची वीस विकासकामे ! दोन वर्षानंतर मंत्रीपदही मिळणार !!जिल्ह्यातील चाळीस ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसएसपींची कडक अॅक्शन, लाचप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यासह तिघे निलंबितमहिला आयोग आपल्या दारी, अध्यक्षांनी केले प्रशासनाचे कौतुकएक जानेवारीपासून सातारा-कोल्हापूर डेमू धावणार नव्या वेळेनुसारकोल्हापुरात शनिवारी-रविवारी मैत्रीण महोत्सव

जाहिरात

 

राजघराण्याचा वारसा, लोकसभेचा उमेदवार, राज्यसभा खासदार ते महाराष्ट्र स्वराज्य पक्ष ! युवराज संभाजीराजेंचा राजकीय प्रवास !!

schedule01 Oct 24 person by visibility 605 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : युवराज संभाजीराजे छत्रपती म्हटलं की शांत, संयमी व स्वतंत्र व वेगळया विचारांनी समाजकारण- राजकारण करणारं व्यक्तिमत्व असं चित्र उभं राहतं. २००९ मधील लोकसभा निवडणुकीत ते उघडपणे राजकारणात सक्रिय झाले. त्या निवडणुकीत पराभव, पुढे राज्यात व केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवरील निवड, रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष, मराठा चळवळीचा चेहरा ते आता महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख हा त्यांचा गेल्या दोन दशकातील प्रवास. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या माध्यमातून त्यांनी तरुणांचे संघटन केले.
 सध्या ते महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याच्या तयारीत आहेत. माजी खासदार राजूश शेट्टी, आमदार बच्चू कडू आणि युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी एकत्र येऊन परिवर्तन महाशक्ती स्थापन केली आहे. ही महाशक्ती आगामी काळात महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय ठरणार का हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाने ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज् पक्षाला पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे. संभाजीराजे हे शिव-शाहूंचे विचारांचे वारसदार समजतात. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या माध्यमातून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा दिनाचे आयोजन करत त्यांनी कार्यकक्षा विस्तारली. त्यांना मानणारा वर्ग आहे. तरुणाईवर प्रभाव आहे. समाजकारणात सक्रिय असलेल्या संभाजीराजे यांना राजकारणात अधिक इंटरेस्ट असल्याचे जाणवते. सर्वपक्षियात त्यांचे संबंध आहेत. २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी लढविली. त्यांची ही पहिलीच निवडणूक. राष्ट्रवादी एकसंध असताना, नेत्यांची तगडी फौज सोबतीला असतानाही त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. काही काळ ते राजकारणापासून लांब असल्याचे चित्र होते.
२०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजप आघाडी सरकार होते. याकाळात ते भाजपच्या जवळ गेल्यासारखी स्थिती होती. मराठा आंदोलनात सक्रिय होते. राष्ट्रपती कोट्यातून ११ जून २०१६ रोजी त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. गडकिल्यांचे संवर्धन हा त्यांचा आवडीचा विषय. ते, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्षही होते. राज्यसभेची मुदतही संपली. दरम्यान ते मराठा आरक्षण-आंदोलनाचा चेहरा बनले होते. भाजपसोबत अंतर राखून होते. लोकसभेच्या २०२४ मधील निवडणूक लढविण्याचा त्यांचा इरादा होता. नाशिक किंवा कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी चाचपणी केली. पुढे लोकसभा निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा केली.
 विविध पक्षातील नेते मंडळीशी त्यांचे संबंध असले तरी ते स्वतंत्र राजकारणी म्हणून अशी प्रतिमा तयार झाली होती. तत्पूर्वी ९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानीच्या साक्षीने त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांना सोबत घेऊन स्वराज्य संघटनेची स्थापना केली. आता या संघटनेला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावांनी राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणी झालल आहे.
स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी पोस्टद्वारे, “आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित !” या भावना व्यक्त केल्या आहेत.
संभाजीराजे आज ५३ वर्षाचे आहेत. ११ फेब्रुवारी १९७१ रोजी त्यांचा जन्म. कोल्हापूरच्या राजघराण्याचा वारसा लाभलेला आहे. सामाजिक प्रश्नांची त्यांना जाण आहे. सध्याच्या आरक्षणाच्या लढाईत समाजा-समाजात अंतर वाढत असल्यासारखी स्थिती आहे.  संभाजीराजे हे शिव-शाहूंच्या विचारांचा वारसा सांगतात. व्यापक दृष्टिकोन अंगिकारुन या काळात साऱ्या समाजाला एकत्र आणून, एकसंधपणे वाटचाल करणे. महाराष्ट्राच्या राजकारणात नवी स्पेस निर्माण करणे आणि सध्य स्थितीत महाराष्ट्राचे राजकारण महायुती-महाविकास आघाडी यांच्याभोवती फिरत असताना महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्वतंत्र ताकत निर्माण करणे, त्या माध्यमातून परिवर्तन महाशक्तीचा पर्याय निर्माण करणे हे मोठे आव्हान असणार आहे. अनेक पक्षापैकी एक पक्ष अशी ओळख महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची राहू नये अशा अपेक्षा नागरिकांच्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes