मालोजी केरकरांना जीवन गौरव ! सुनील सकटे, राहुल गडकरांना लक्षवेधी पत्रकार पुरस्कार
schedule02 Sep 24 person by visibility 268 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर प्रेस क्लब व कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा यावर्षीचा जाॅनी ट्रेनर स्मृती जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ छायाचित्रकार मालोजी केरकर यांना तर पत्रकार सुनिल सकटे व राहुल गडकर यांना रोहन साळुंखे स्मृती गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून छायाचित्र प्रदर्शन व जाॅनी ट्रेनर स्मृती जीवन गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येते.या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ छायाचित्रकार मालोजी केरकर यांना जाहीर करण्यात आला असून त्याचबरोबर यावर्षी पासुन प्रिंट मिडीयातील पत्रकारांना कै रोहन साळोखे याच्या स्मरणार्थ लक्षवेधी पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.सन २०२३ साठी पुढारीचे पत्रकार सुनिल सकटे तर २०२४ साठी सरकारनामाचे राहूल गडकर यांना लक्षवेधी पुरस्काराने मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शाहू स्मारक भवन येथे गौरविण्यात येणार आहे.