कोल्हापूरच्या बांधकाम व्यावसायिकांची हिंदी चित्रपटनिर्मिती, बारदोवी दोन ऑगस्टपासून प्रदर्शित
schedule02 Aug 24 person by visibility 382 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक म्हणून वीस वर्षे कार्यरत. या क्षेत्रात काम करत असताना नवं काही करता येईल का ? यासंबंधी सतत विचार सुरू होता. त्यातूनच सिनेमा निर्मिती करायचं ठरलं आणि ‘बारदोवी’हा सिनेमा तयार झाला. कोल्हापूरचे बांधकाम व्यावसायिक अमित जाधव या सिनेमाच्या माध्यमातून निर्माते म्हणून पुढे येत आहेत.
मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या "बारदोवी" या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरने चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवली असून, कसलेले अभिनेते, गुंतवणारं कथानक असलेला हा चित्रपट २ ऑगस्टला भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
यासंबंधी निर्माते जाधव म्हणाले, ‘ लेखक, दिग्दर्शक करण चव्हाण यांच्यासोबत माझी ओळख झाली. त्यांनी याआधी बनवलेला एक मराठी चित्रपट मला आवडला होता. त्यानंतर त्यांनी मला "बारदोवी' या चित्रपटाची कथा ऐकवली जी मला आवडली आणि लगेचच मी माझा मुलगा अर्जुन सोबत चर्चा करून हा चित्रपट निर्माता म्हणून करण्याचे ठरविले.’
"बारदोवी" या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन करण शिवाजीराव चव्हाण यांनी केलं आहे. सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत "बारदोवी" या चित्रपटाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे.
अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप बाबूराव काळे, एल्विन राजा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर छाया कदम सहनिर्मात्या आहेत. तर संतोष बळीराम तांबे, रवीराज शिवाजी वायकर, अभिजित सुमन वसंत पाटील, नितीन पाटील सहायक निर्माता आहेत. या सिनेमात छाया कदम, चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत आहेत. विक्रम पाटील यांनी कॅमेरा, अरविंद मंगल यांनी प्रोडक्शन डिजाइन आणि विकास डीगे कार्यकारी निर्माता आहेत.
चित्रपटाचा ट्रेलर मती गुंग करणारा आहे. चित्रपटाचं चित्रीकरण आणि व्हीएफएक्स उच्च दर्जाचे आहेत. त्यामुळे कसदार कथानकाला दमदार तांत्रिक बाजू, पार्श्वसंगीताची साथ असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. म्हणूनच हा चित्रपट हिंदीतील वेगळा अनुभव देणारा ठरेल असा विश्वास कलाकार व तंत्रज्ञ व्यक्त करत आहेत.