+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Aug 22 person by visibility 870 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :  महापालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेल प्राधान्यक्रम देत संभाजीनगर महापालिकेने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू केली. मात्र कोल्हापूर महापालिका प्रशासन स्तरावर फारशा हालचाली होताना दिसत नाहीत. नगरविकास विभागाच्या आदेशानंतर महापालिकेने पाच अधिकाऱ्यांच्या समितीची स्थापना केली. मात्र गेल्या दोन महिन्यात या समितीची एकही बैठक झाली नसल्याचे वृत्त आहे. बैठकीअभावी निश्चित धोरण ठरेना, परिणामी महापालिकेचे तब्बल दोन हजारहून अधिक कर्मचारी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.
वैद्यकीय खर्चासह अन्य सुविधापासून महापालिकेचे कर्मचारी अलिप्त आहेत. सरकारी सेवेत २००५ नंतर रुजू आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ऐवजी नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना (डीसीपीएस) लागू केली. ही योजना २०१५ मध्ये केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत (एनपीएस) समाविष्ठ केली.  नव्या योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना महापालिका सोयीनुसार ही योजना राबवत असल्याचे समोर येत आहे. या अनियमतेवर बोट ठेवून नगर विकास विभागाने फेब्रुवारी २०२२ मध्ये नवीन पेन्शन योजने बाबतचा विस्तृत आदेश काढला आहे.
 परंतु जवळपास पाच महिने होऊनही अद्यापही योजना महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना लागू केली नाही. त्यामुळे महापालिकेतील तरूण कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात आहे. होणाऱ्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांच्या अतोनात नुकसान होत आहे. दुर्दैवाने एखादी कर्मचारी मयत झाल्या तर त्याचे कुटुंबीय रस्त्यावर येऊ शकतात याची जाणीव असूनही प्रशासनाकडून गांभीर्याने हालचाली होताना दिसत नाहीत. 
 वास्तविक, योजना पूर्वीच लागू केले असते तर मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दहा लाख रुपयांची मदत मिळू शकते असती. 
नगरविकास विभाग नवीन योजनेविषयी वारंवार सूचना देत आहे. महापालिकेतील र्झांडू कामगार, सफाई कामगार, शिपाई यांचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होते. महापालिकेतील कर्मचारी, पाणी पुरवठा विभाग आणि शिक्षण समितीकडील कर्मचारी मिळून कोल्हापूर महापालिकेतील संख्या २००० हून अधिक आहे. २००५ नंतर नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आहे. औरंगाबाद वगळता राज्यातील एकाही महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे एनपीएस मध्ये खाते नाही अथवा त्यांना जुनी पेन्शन सुद्धा लागू नाही.
नगरविकास विभागाच्या आदेशानुसार महापालिका स्तरावर एनपीएसच्या अंमलबजावणीसाठी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, मुख्य वित्त व लेखाअधिकारी सुनील काटे, मुख्य लेखापरीक्षक मिलिंद कुलकर्णी यांची एक समिती स्थापन केली. एनपीएस लागू करण्यासंबंधी प्रस्ताव तयार आहे.  समितीची स्थापना होवून दोन महिन्याचा कालावधी उलटला.पण समितीची एकही बैठक झाली नाही. यामुळे कर्मचारी विमा सुरक्षा, वैद्यकीय लाभ व इतर सुविधापासून वंचित राहत आहेत. प्रशासन कधी अॅक्शन मोडवर येणार असा प्रश्न कर्मचारी विचारत आहेत.
.....................
कर्मचाऱ्यांचे नुकसान होउ नये यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. समितीची प्राथमिक स्तरावरील बैठक झाली आहे. एनपीएस लागू करण्यासंबंधी तरतूद, महापालिकेवरील खर्च, आवश्यक निधी यासंबंधी माहिती संकलित केली जात आहे. काही दिवसात समितीची बैठक होईल.
-नितीन देसाई, अतिरिक्त आयुक्त महापालिका कोल्हापूर
........................
एनपीएस योजना लागू करावी यासाठी कर्मचारी संघाकडून प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. प्रशासनाला पत्रही दिले आहे. योजनेमुळे कर्मचाऱ्याना विम्याचे संरक्षण, वैद्यकीय खर्चासह अन्य सुविधा मिळणार आहेत.
-संजय भोसले, अध्यक्ष महापालिका कर्मचारी संघ
........................