+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule14 Jan 23 person by visibility 487 categoryराजकीय
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे  सोमवारी (१६ जानेवारी) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी साडेदहा वाजता सर्किट हाऊस येथे कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. तत्पूर्वी ते सकाळी साडेनऊ वाजता करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत.
  किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील विविध नेत्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपानंतर अनेक नेत्यांच्या निवासस्थानावर ईडीची छापे पडले होते. तसेच चौकशी झाली आहे. सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते हसन मुश्रीफ यांच्यावरही आरोप केले आहेत. दरम्यान मुश्रीफ यांनी सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान नुकतेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी, मुश्रीफ यांच्या कागल व पुणे येथील निवासस्थानावर छापे टाकले आहेत.