+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Sep 22 person by visibility 460 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या शिष्टमंडळाने स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे केली.
संभाजीराजे यांनी केंद्रीय कायदामंत्री किरण रिजुजू यांच्याशी दूरध्वनीवर संभाषण केले व लवकरच दिल्ली येथे त्यांची भेट घेऊन भारताचे पहिले व महाराष्ट्राचे एकमेव ऑलिंपिक पदक विजेते पैलवान खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी पैलवान संग्राम कांबळे, कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे कोल्हापूर शहराध्यक्ष बाबाराजे महाडिक, पैलवान खाशाबा जाधव यांचे पुतणे शामराव जाधव, नागेश गुरव उपस्थित होते.