+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही हे शाहू महाराजांनी दाखवून दिले-कपिल पाटील adjust आमदार प्रकाश आवाडे निवडणूक लढवणार, हातकणंगलेत अपक्ष उमेदवारी adjustगोकुळमार्फत सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा adjustशिक्षक बँकेतील राजकारणाचे कवित्व ! एकमेकांच्या कामकाजाचा पर्दाफाश ! adjustगोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक ! दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूध विक्री adjustरोटरी गार्गीजतर्फे सोळा एप्रिलला भरतनाट्यम कार्यक्रम adjustसभेच्या मान्यतेने अमृत संजीवनी योजना, विक्रमी नफ्यामुळे विरोधकांना पोटशूळ- अध्यक्ष राजेंद्र पाटील adjustनिवडणुकीचा मांडव आपल्या दारात; तिन्ही गटांचा समन्वय ठेवा-हसन मुश्रीफ adjustशक्तिपीठ महामार्ग धनदांडग्यासाठी, शेतकऱ्यांची बैलगाडी त्यावर धावणार का ? - संजय घाटगे adjustटेंबलाईवाडी विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार - जिल्हाधिकारीसो अमोल येडगे
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Feb 24 person by visibility 94 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : यजमान खंडोबा तालीम मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर ५-१ असा दणदणीत विजय मिळवून के. एम. चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. खंडोबाच्या सुधीर कोटीकाला याने शानदार हॅटट्रिकची नोंद केली. खंडोबा तालीम मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. उद्या गुरुवारपासून उपांत्य सामन्यांना प्रारंभ होत आहे.
खंडोबा आणि प्रॅक्टिस यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. सामन्याच्या सातव्या मिनिटात खंडोबाच्या आदित्य लायकर याने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. बरोबरी साधण्यासाठी प्रॅक्टिसने जोरदार चढाया केला पण खंडोबाने भक्कम बचाव केला. मध्यंतरास खंडोबा संघ १-० असा आघाडीवर होता.
उत्तरार्धात पहिल्याच मिनिटाला सुधीर कोटीकाला याने मैदानी गोल करत खंडोबाला आघाडीवर नेले. ४६ व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या राजू राजा छत्रीने लिफ्ट विंग मधून डी मध्ये प्रवेश करेल जोरदार फटक्याद्वारे सुंदर गोल केला. या गोल नंतर खंडोबाच्या गोलचा धडाका सुरू झाला. ५० व्या आणि ५५ मिनिटाला सुधीर कोटीकाला याने प्रॅक्टिसच्या बचाव फळी आणि गोलरक्षक सुखदेव पाटील याला चकवत दोन गोल करत सामन्यातील हॅटट्रिकची नोंद केली. त्यानंतर ६७ व्या मिनिटाला कुणाल दळवी याने मैदानी गोल केला. चार गोलच्या भक्कम आघाडीमुळे प्रॅक्टिसचा खेळ विस्कळीत झाला. खंडोबाची सातत्याने आक्रमणे सुरू झाली. कुणाल दळवीचा वेगवान फटका आडव्या गोलखांबालातटला. पूर्ण वेळेत चार गोलची आघाडी कायम टिकवून खंडोबाने सामना जिंकून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. खंडोबाकडून केवळ कांबळे, दिग्विजय असणेकर, कुणाल दळवी, संकेत जरग, पृथ्वीराज साळोखे तर प्रॅक्टिसकडून राहुल पाटील, साहिल डाकवे, राजा छेत्री, आकाश बावकर, रोहित भोसले यांचा चांगला खेळ झाला, हॅटट्रिक करणाऱ्या सुधीर कोटीकाला याची सामनावीर तर प्रॅक्टिसचा राजा छेत्री याची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली. 
गुरुवारचा उपांत्य सामना, शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ, दुपारी चार वाजता.