राष्ट्रीय स्तरावरील सहा पुरस्कारांनी नवी दिल्लीत केआयटीचा सन्मान
schedule04 Oct 24 person by visibility 255 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाला ‘एज्यूस्कील’ यांनी ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांच्याशी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘एज्यूस्कील कनेक्ट -२४’ ‘नेक्स्ट जनरेशन स्किल’ आणि ‘एच.आर.समिट २४’ मध्ये बेस्ट परफॉर्मिंग संस्था-२४ (पश्चिम विभाग) यासह अन्य राष्ट्रीय स्तरावरील पाच पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा कार्यक्रम २७-२८ सप्टेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे झाला.
२७ सप्टेंबर २४ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात एआयसीटीई चे अध्यक्ष टी.जी. सितारामन, एआयसीटीई सदस्य सचिव श्री.राजीव कुमार, प्रा. के. के. अग्रवाल, माजी अध्यक्ष एआयसीटीई सुभाजित जगदेव संस्थापक अध्यक्ष एज्यूस्कील यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. बेस्ट परफॉर्मिंग इन्स्टिट्यूट या पुरस्कारासोबत डिरेक्टर एक्सलन्स अवॉर्ड, बेस्ट परफॉर्मिंग सेंटर ऑफ एक्सलन्स सीओई कोऑर्डिनेटर डॉ.ममता कळस, राष्ट्रीय स्तरावरील रँक ४६ , वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, टॅलेंट कनेक्टेड पुरस्कार डॉ. अमित सरकार. या अन्य ५ पुरस्काराने कॉलेजला सन्मानित करण्यात आले आहे.
केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले " केआयटी साठी हा खूप मोठा आणि अभिमानाचा क्षण आहे.एआयसीटीईच्या सहकार्याने सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये प्राध्यापकांनी सायबर सुरक्षा, क्लाऊड कम्प्युटिंग,आरपीए,डेटा अनालिसिस यासारख्या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.
संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली,उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले व विश्वस्त यांच्या सततच्या प्रोत्साहन व सहकार्यामुळे केआयटीला असे उज्ज्वल यश मिळत आहे. संगणक विभागाच्या डॉ.ममता कळस यांनी या ‘एज्यूस्कील’ अंतर्गत विविध परीक्षांचे समन्वयक म्ह्नणून काम पाहिले.