+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule23 Jul 24 person by visibility 164 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) मधील इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) व टेक्निकल क्लब अंतर्गत इलेक्ट्रिकल विभागातर्फे द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता 'मुलाखत कौशल्य, व्यक्तिमत्व विकास' या विषयावर दोन दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा  झाली.
 रुबिकॉन स्किल डेव्हलपमेंट सेंटर मुंबई यांच्या तज्ञ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना भरती प्रक्रिया, उत्कृष्ट बायोडाटा, अर्ज करणे, मुलाखतीची तयारी, पेहराव यासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष मुलाखतीदरम्यान संभाषण कौशल्य, सकारात्मक देहबोली, आपले शिक्षण; अनुभव; व्यावसायिक कौशल्ये यांचे प्रभावी सादरीकरण, हजरजबाबीपणा याबाबतच्या सांगितल्या. दर्जेदार तंत्रशिक्षणासोबत एनआयटीमधील विद्यार्थी उत्कृष्ट करिअरसाठी सुसज्ज होण्यास पोषक असा हा उपक्रम असल्याचे नमुद करत संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 
 इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. बाजीराव राजिगरे यांनी परिचय करुन दिला. समन्वयक प्रा. प्रशांत गुरुपादगोळ यांनी आभार मानले. प्रा. किरण वळीवडे, प्रा. राजेश कुलकर्णी, प्रा. ऋषिकेश कट्टी, प्रा. जी एस क्षीरसागर, यांनी कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले. संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांचे उपक्रमास प्रोत्साहन लाभले. यावेळी रजिस्ट्रार डाॅ. नितीन पाटील, आयआयसी अध्यक्ष प्रा. अश्विनकुमार व्हरांबळे, समन्वयक प्रा. वैभव पाटणकर आदी उपस्थित होते.