+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule23 Jul 24 person by visibility 100 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
भारतीय कृषी अनुसंशाधन अटारी बेंगलुरू, अटारी पुणे व श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने किसान समृद्धी ॲपच्या वापराबाबत आंतक्षेत्रीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेमध्ये श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रा मार्फत राबवण्यात आलेल्या समूह प्रात्यक्षिक व सोयाबीन बिज उत्पादन मॉडेल गावच्या लाभार्थींना मृदा आरोग्य कार्डचे वाटप केले. कृषी विज्ञान केंद्राच्या विविध प्रकल्पांना भेट दिली.
 परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराज, अटारी बेंगलुरुचे संचालक डॉ. सी वेंकट सुब्रमण्यम, पुणे येथील डॉ. एस. के. रॉय, अटारी पुणे येथील प्राचार्य डॉ. शाकीर अली, शास्त्रज्ञ डॉ.डी.कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यशाळा झाली.
कार्यशाळेचे उद्घाघाटन परमपूज्या काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या उपस्थितीत झाले. त्यांनी, किसान समृद्धी ॲप शेतकरी, कृषी विज्ञान केंद्र,व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी तयार केलेल्या उत्पादनासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे व याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. डॉ. ही व्यंकट सुब्रमण्यम, यांनी कृषी विज्ञान केंद्रांचे शेतकऱ्यांसाठीच कार्य, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेला बदल यासंबधी मार्गदर्शन केले.
डॉ एस के रॉय, यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनीचे उत्पादने या प्लॅटफॉर्म वरती जोडले जातील व शेतकऱ्यांना एक चांगला ऑनलाईन मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म मिळेल याची ग्वाही दिली. डॉ. सी. पी. रॉबर्ट यांनी किसान समृद्धी या ॲपबद्दल माहिती दिली.
  विशेषतज्ज्ञ राजेंद्र वावरे यांनी प्रास्ताविक केले. कृषी विज्ञान केंद्र प्रमुख डॉ. रवींद्र सिंग यांनी आभार व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रातील विशेषतज्ज्ञ पांडुरंग काळे, डॉ. पराग तुरखडे, प्रतिभा ठोंबरे, डॉ. सुनील कुमार, डॉ, पुष्पानाथ चौगुले सहभागी झाले होते.