+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule01 Dec 22 person by visibility 416 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत इंडियन डेअरी फेस्टिवलचे आयोजन केले आहे अशी माहिती प्रमुख संयोजक व गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके यांनी दिली.
 "नांदी... नव्या धवल क्रांतीची" हे घोषवाक्य घेऊन आणि सद्यस्थितीतील पशुधन डेअरी क्षेत्रातील उपलब्ध पायाभूत सुविधांच्या बळावर अधिक गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन संकलन हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून फेस्टिवल आयोजित केले आहे. दूध प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व फायदेशीर पशुपालन हा यामागील प्रमुख उद्देश आहे. या फेस्टिवलमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यातील सहकारी व खाजगी दूध संघ, देशातील डेअरी उद्योगातील सर्व सहयोगी घटक सहभागी होणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले आहे. कोल्हापूर विभागात प्रथमत अशा प्रकारचा फेस्टिवल होणार आहे.
या फेस्टिवल अंतर्गत हॉटेल सयाजी येथे दूध परिषद होणार आहे. देशातील दुग्ध व्यवसाय संधी आव्हाने दूध उत्पादनात वाढ आणि 2030 पर्यंत ठरवण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ सर्व घटक आणि सरकारी व्यवस्था एकत्रित येणार आहेत. यासोबत दूध उत्पादक शेतकऱ्यापासून दूध संस्था दूध प्रक्रिया संघ आणि ग्राहक या सर्व घटकांना लागणारी आवश्यक माहिती तंत्रज्ञान एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी शाहूपुरी जिमखाना मैदान येथे डेअरी एक्सपो होणार आहे. या उद्योगात काम करणाऱ्या आणि हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वांना पशुसंवर्धन डेअरी उद्योगाची माहिती करून देणारे पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये डेअरी उद्योगाचा वाटा वाढविण्याच्या दृष्टीने फेस्टिवल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पत्रकार परिषदेला गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके, चितळे डेअरीचे गिरीश चितळे, वारणा डेअरीचे अनिल हेरलेकर, जे.बी.पाटील, भारत डेअरीचे किरीट मेहता, थोरात डेअरीचे आबासाहेब थोरात,  विराज डेअरीचे विशाल पाटील, गोविंद डेअरीचे संजीवराजे निंबाळकर, 
राजारामबापू दूध संघाचे नेताजीराव पाटील, कुटवळ डेअरीचे प्रकाश कुटवळ, थोपटे डेअरीचे नितीन थोपटे
समाधान डेअरीचे राहुल थोरात, विमल डेअरीचे सुभाष मयेकर, दत्त इंडिया डेअरीचे सबर्जित आहुजा, मयुरेश टेक्नोलॉजीचे संजीव गोखले यांच्यासह विविध डेअरीचे अधिकारी उपस्थित होते.