+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule20 Jul 24 person by visibility 124 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : धरणक्षेत्रासह जिल्हयाच्या विविध भागात पावसाच संततधार कायम आहे. नद्यांच्या पाणी पातळीवत  वाढ होत आहे. जिल्ह्यातील ७७ बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदींची पाणी पातळी राजाराम बंधारा येथे ३6  फूट एक इंचापर्यंत पोहचली आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फुटाला आहे. राधानगरी धरणातून १४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नागरिकांता सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे व कोवाड वेदगंगा नदीवरील- म्हसवे, शेणगाव, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली व करडवाडी हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, विलजी, ऐनापूर व गिजवणे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिध्दनेर्ली, सुळकूड व बाचणी कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते सावर्डे व सरुड पाटणे, वारणा नदीवरील -चिंचोली, तांदूळवाडी, कोडोली, माणगाव, खोची व शिगाव भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, शिरगाव व तारळे कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, मांडुकली व वेतवडे कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजार भोगाव,पेंडाखळे, करंजफेण, कुंभेवाडी, सुसकेवाडी, नवलाचीवाडी-1 व नवलाचीवाडी-2 धामीण नदीवरील- सुळे, पनोरे व आंबर्डे घटप्रभा नदीवरील- हिंडगाव, कानडे-सावर्डे, आडकुर, तारेवाडी, कानडेवाडी, बिजूर भोगोली व पिळणी, तुळशी नदीवरील – बीड बंधारे असे एकूण ७७ बंधारे पाण्याखाली आहेत.