+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule21 Jul 24 person by visibility 128 categoryराजकीय
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असताना प्रत्येक मतदारसंघात आतापासूचन पडघम वाजू लागले आहेत. इच्छुक उमेदवार आणि आजी-माजी आमदारांमध्ये मतदारसंघातील कामावरुन तू तू मैं मैं सुरू आहे. कोणताही मतदारसंघ त्याला अपवाद नाही. दरम्यान राधानगरी-भुदरगड मतदारसंघात मात्र आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्यामध्ये जोरदार खडाखडी सुरू आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यासारखे दोघेही एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. राजकीय टीकाटिप्पणी आता एकमेकांच्या कमिशनच्या टक्केवारीपर्यंत घसरली आहे.
राजकीय वार-पलटवारमुळे ऐन पावसाळयात राधानगरी-भुदरगड मतदारसंघात वातावरण गरम बनले आहे. विधानसभेत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणारे के. पी. आणि आबिटकर यांच्यातील लढाई आता प्रत्येक निवडणुकीत दिसू लागली आहे. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत दोघे एकमेकांना भिडले. आरोप, प्रत्यारोपामुळे राळ उडाली. बिद्रीच्या लढाईत के.पी. यांनी बाजी मारली. कधी विधानसभा, कधी बिद्रीची निवडणूक यामुळे मतदारसंघत कायम चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे घटक म्हणून के. पी. हे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात दिसले. मात्र के पी आणि आबटिकरांत सख्य मात्र झाले नाही. के. पी. यांची फौज महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारात होती. लोकसभा निवडणुकीनंतर शाहू छत्रपती व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे मुदाळ येथे के. पी यांनी जे स्वागत केले त्यावरुन ते महाविकास आघाडीच्या वाटेवर अशी चर्चा कायम आहे.
दरम्यान बिद्री कारखान्यावरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने आबिटकर आणि के. पी पुन्हा भिडले. एकमेकावर रोज नवनवीन आरोप सुरू आहेत. या आठवड्यात दोघांनीही एकमेकांवर विकासकामे आणि खरेदीतील कमिशनवरुन हल्लाबोल केला. यामुळे दोघांचा कारभार आणि कामातील टक्केवारी यावर मतदारसंघात आकडेमोड सुरू आहे. व्यक्तीद्वेषातून टीका का ? असा सवालही एकमेकांना करत आहेत.
………………………………..
कारखाना म्हणजे के.पी.साठी विधानसभा, तेच मुख्यमंत्री-तेच मंत्री
“कारखान्याच्या खिळामोळयाच्या खरेदीत चाळीस टक्के कमिशन घेत के. पी. पाटील यांनी घरादार पोसले आहे. प्रत्येक कामात टेंडर मॅनेज करण्यात ते माहीर आहेत. चाळीस टक्के कमिशन घेणाऱ्या के. पी यांनी आम्हाला नितीमत्ता शिकवू नये. त्यांनी दोन वर्षात चार वेळा पक्ष बदलला. बिद्री कारखान्याची सत्ता म्हणजे के. पी. यांच्यासाठी विधानसभा आहे. कारखान्यात तेच मुख्यमंत्री, तेच मंत्री असता. इतर संचालक फक्त नावाला आहेत. निवडणुकीच्या कालावधीत कार्यकर्त्यांना संचालक करतो अशी आश्वासने द्यायची, तरुणांना नोकऱ्या लावतो म्हणून चिठठ्या द्यायच्या. खोटया आश्वासनावर त्यांचे राजकारण आहे. कार्यकर्ते आणि तरुण म्हातारे झाले, पण त्यांच्या नशिबी काही संचालकपद आणि नोकऱ्या नाहीत.”
- आमदार प्रकाश आबिटकर, राधानगरी-भुदरगड मतदारसंघ
………………………………………………..
टाक कमिशन घे परमिशन हे आबिटकरांचे धोरण,
“स्वत:च्या स्वार्थासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी गुवाहाटीला जाऊन किती माया गोळा केली हे जनतेला माहित आहे. मतदारसंघातील समस्या, विकासकामांचा दर्जाशी त्यांचे काही देणेघेण नाही. कंत्राटदारांकडून ‘‘टाक कमिशन, घे परमिशन” या पद्धतीचे त्यांचे कामकाज आहे. कोट्यवधीची माया गोळा कली आहे. पालीच्या डोंगरासह अन्य ठिकाणी शेकडो एकर जमिनी उभारल्या. आबिटकरांनी गेल्या दहा वर्षात किती संपत्ती गोळा केली ? हे जनतेला समजले आहे. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी त्यांना जागा दाखवून दिली. मात्र ते बिद्रीच्या आडून माझी बदनामी करत आहेत. कमिशनमध्ये लोळणाऱ्या आबिटकरांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा पहिल्यांदा स्वतचे कर्तृत्व तपासावे. त्यांचे लखोबा लोखंडेचे रुप जनतेसमोर आले आहे.”
-के. पी. पाटील, चेअरमन बिद्री कारखाना