कागलमध्ये चहापेक्षा जादा गरम झालेली किटलीच बदला- सचिन अहिर
schedule30 Sep 24 person by visibility 145 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कागलमध्ये चहापेक्षा किटलीच जादा गरम झालेली आहे.ही गरम झालेली किटलीच बदला,अशी टीका आमदार सचिन अहिर यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता केली.
मुंबई येथील श्रमिक जिमखाना मैदानात कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील मुंबईस्थित नागरिकांच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने अध्यक्षस्थानावरुन साधताना ते बोलत होते. मंत्री मुश्रीफांना उद्देशून बोलताना आमदार अहिर म्हणाले, ‘वर्षातून किमान दोन वेळा मुंबईकरांशी संवाद साधणे अपेक्षित होते.मात्र ते पाच वर्षातून एकदाच मतदानापूरते मुंबईकरांकडे येतात निवडणुकीनंतर त्यांच्याकडे पाहिल्या नाहीत किंवा येथील गडहिंग्लज उत्तुर आजरा स्थित नागरिकांचे काय प्रश्न आहेत हे कधीही समजून घेतले नाहीत. मुंबईमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने पश्चिम महाराष्ट्रसाठीचे भवन उभारण्याच्याही केवळ घोषणाच केल्या. या पूर्ण करण्याची जबाबदारी समरजितसिंह घाटगे आता तुमच्यावर येणार आहे.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, कागलमधील निवडणुक दोन व्यक्तीमध्ये नव्हे तर निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर अशा दोन प्रवृतींमध्ये होत आहे.मुंबईच्या चाळीत व खोल्यांमध्ये या नागरिकांचे काय हाल होतात हे मी जवळून पाहिले आहे.त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपल्बध करुन देण्याचा आमचा अजेंडा आहे.
आमदार सुनिल शिंदे, आमदार अजय चौधरी, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, संजय कांबळे, बाळासो गुजर, शिवानंद माळी यांनीही मनोगत व्यक्त केले. निवृत्ती देसाई यांनी स्वागत केले.अशोक तर्डेकर यांनी आभार मानले.