+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान
1001130166
1000995296
schedule22 Jul 24 person by visibility 271 categoryउद्योग
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " दूध उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून कामकाज करत असताना जनावरांच्या उपचारासाठी गोकुळच्या आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. ही हर्बल पशुपूरक उत्पादने  गोकुळच्या दूध उत्पादनात वाढ  व दुधासह अन्य पदार्थांची गुणवत्ता उंचावण्यासाठी  उपयुक्त ठरतील. तसेच जनावरांच्या उपचारासाठी गोकुळची आयुर्वेदिक उत्पादने प्रभावी  आहेत. या पशुपरक उत्पादनांचा निश्चितच दुग्ध व्यवसायिकांना फायदा होईल. तसेच चांगल्या प्रतीच्या दुधाचे उत्पादन होईल. " असे पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
 कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघाच्या वतीने गडमुडशिंगी येथील गोकुळच्या पशुखाद्य कारखाने येथे हर्बल पशुपरक उत्पादन प्रकल्पाचा कार्यान्वित केला आहे.  पालकमंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. आमदार ऋतुराज पाटील, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये  सोमवारी दुपारी हा कार्यक्रम झाला. या प्रकल्पांतर्गत रोज एक हजार किलो उत्पादनाची निर्मिती होणार आहे. जनावरांच्या उपचारासाठी महाराष्ट्रातील एकमेव  गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्प हा पथदर्शी ठरेल असेही आमदार  पाटील यांनी सांगितले. सव्वा कोटीहून अधिक रक्कम खर्च करून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. एनडीडीबीच्या सहकार्यातून हा प्रकल्प साकारला. या प्रकल्पात गोकुळचा हिस्सा 70 टक्के तर एनडीडीबीचे 30 टक्के सहकार्य आहे. नैसर्गिकपणे सहज उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पती व स्वयंपाक घरातील दररोजच्या वापरातील विविध मसाल्यांचे पदार्थांचा वापर करून अॅलोव्हेरा, ज्यूस, हळद चूर्ण पंचामृत, ज्वरशामक,  पाचक, ट्रायसो या सहा हर्बल पशु परक उत्पादनांची निर्मिती सुरू केली आहे, 
 सतेज पाटील म्हणाले, गोकुळने उत्पादित केलेल्या हर्बल पशुपूरक उत्पादनांच्या वापरामुळे दूध उत्पादकांचा जनावरांच्या औषध उपचारावरील खर्च कमी होणार आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये (इ.व्ही.पी- एथनो व्हेटरनरी प्रिपरेशन) शेतकऱ्यांच्या घरात उपलब्ध असलेल्या व पर्यावरणपूरक सामुग्रीचा वापर करून जनावरांच्या आजारावर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे प्रतिजैवक (अँटिबायोटिक) औषधांचा होणारा अति वापर कमी होऊन प्रतिजैवक (अँटिबायोटिक) अंश विरहित दूध निर्मिती होऊन चांगल्या प्रतीच्या दुधाचे उत्पादन करून ग्राहकांना देणे शक्य होणार आहे.  
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, गोकुळच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना ही पशु पूरक उत्पादने मोफत दिली जाणार आहेत. तर अन्य उत्पादकांना माफक दरात ही उत्पादने उपलब्ध करून दिली जातील. जनावरांच्या उपचारासाठी ही आयुर्वेदिक उत्पादने फायदेशीर ठरणार आहेत. या आयुर्वेदिक उत्पादनांचा कोणताही साईड इफेक्ट नाही. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी हर्बल पशुपूरक प्रकल्पाचा उद्देश सांगितला. हर्बल आयुर्वेदिक उत्पादनामुळे जनावरांच्या विविध आजारावर खात्रीशीर उपचार करणे सहजसुलभ  होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते ए वाय पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप माने, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, शशिकांत पाटील चुयेकर, चेतन नरके, अभिजीत तायशेटे, अंबरीश घाटगे,  अजित नरके, रणजीत पाटील,  प्रा. किसन चौगुले, नंदकुमार ढेंगे, करणसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगुले, एस आर पाटील बयाजी शेळके, अंजना रेडेकर, युवराज पाटील मुरलीधर जाधव आर डी मोरे ,  कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्यासह सर्व संचालक, प्राथमिक दूध संस्‍थांचे प्रतिनिधी, गोकुळचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.