+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule07 Jul 24 person by visibility 97 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध उत्पादकांंना गाय दूध खरेदी दरात वाढ केली आहे. कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दर .५ फॅट व ८.५ एस.एन.एफ गुणप्रतीस प्रतिलिटर ३० रुपये इतका करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे. एक जुलै २०२४ पासून ही दरवाढ लागू असणार आहे.
गोकुळचे कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध संकलन प्रतिदिनी सुमारे दोन लाख लिटर्स इतके असून या दर वाढीमुळे गोकुळच्या कार्यक्षेत्राबाहेरील ३५ हजार गाय दूध उत्पादकांना फायदा होणार असल्याचे गाेकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी म्हटले आहे. 
चेअरमन डोंगळे यांनी म्हटले आहे, ‘जागतिक बाजारपेठेत दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्याने महाराष्ट्रामध्ये खाजगी व इतर दूध संघांचे गाय दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २७.०० रुपये पर्यंत कमी झाले होते. म्हणून गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने नुकतेच गाय दूध खरेदीसाठी दि.०१/०७/२०२४ इ.रोजी पासून प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले. परंतु या अनुदानास पात्र होण्यासाठी प्रतिलिटर किमान ३० रुपये दर देण्याची अट आहे. सध्या गोकुळ दूध संघामार्फत जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३३.०० रुपये तर जिल्ह्याबाहेरील गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर २८.५० रुपये दर दिला जात आहे.  
सरकारचा गाय दूध अनुदानास पात्र होण्यासाठी यापूर्वी कार्यक्षेत्राबाहेरील कमी केलेले दरात वाढ करून गाय दूध खरेदीचा दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ गुणप्रतीस प्रतिलिटर ३० रुपये इतका करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्‍या मिटिंगमध्‍ये घेण्‍यात आला असून या निर्णयाचा फायदा गोकुळच्या सांगली, सोलापूर, कर्नाटक, कोकण येथील गाय दूध उत्पादकांना होणार आहे. तथापि, जिल्ह्यातील गाय दूध खरेदी दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.’