+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Dec 22 person by visibility 330 categoryउद्योग
चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते गोकुळच्या वाहनांचे पूजन, भाविकांच्या सोयीसाठी गोकुळ प्रयत्नशील
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक(गोकुळ) संघाने सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रा कालावधीत भाविकांना गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करुन दिले. यात्रेनिमित्त गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेउन वाहने सौंदत्तीकडे रवाना झाली. गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते गोकुळच्या वाहनांचे पूजन करण्यात आले. ओढयावरील रेणुका मंदिर येथे हा कार्यक्रम झाला.
 बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा चार ते सात डिसेंबर २०२२ या कालावधीत होत आहे. यात्रेसाठी महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यातील लाखो भाविका डोंगराव येतात. रेणुका देवीच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांत कोल्हापूरकरांची संख्या मोठी आहे.
यात्रा कालावधीत सौंदत्ती येथे पूजाअर्चा, नैवेद्यासाठी गोडधोड प्रसाद हे नित्यनेमाचे कार्यक्रम होत असतात. शिवाय यात्रेसाठी आलेल्या नागरिका व लहान मुलांना दर्जेदार दुधाची गरज भासत असते. यासाठी गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थ गोकुळने उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी यात्रा कमिटीने गोकुळ चेअरमन विश्वास पाटील यांच्याकडे केली होती. यात्रा कमिटीसोबत झालेल्या चर्चेनुसार गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी भाविकांच्या सोयीसाठी गोकुळतर्फे दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करुन दिले जातील अशी ग्वाही दिली होती.
चेअरमन पाटील यांनी संचालक मंडळाशी चर्चा केली आणि पुढील कार्यवाहीच्या अनुषंगाने गोकुळच्या व्यवस्थापनला सूचना केल्या. सौंदत्ती यात्रा कालावधीत दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करुन द्यावेत असेही सांगितले. त्यानुसार गोकुळची वाहने रविवारी (ता.४ ) दूध व दुग्धजन्य पदार्थ घेउन सौंदत्तीकडे रवाना झाल्या. तत्पूर्वी चेअरमन पाटील यांच्या हस्ते गोकुळच्या वाहनांचे पूजन करण्यात आले. ‘भाविकांच्या सोयीसाठी गोकुळ प्रयत्नशील आहे.’असे चेअरमन पाटील यांनी नमूद केले.
याप्रसंगी गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे,संचालक अजित नरके, गोकुळचे मार्केटिंग अधिकारी हनमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त मंडळसेवा संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील , सचिव प्रशांत खाडे, सदस्य श्री मांगलेकर, रणजीत मंडलिक प्रशांत मंडलिक उपस्थित होते .