+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Aug 22 person by visibility 411 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महिलांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी ‘सुदृढ नारीशक्ती’ अभियान सुरू केले आहे. आपल्या गावात, आपल्या घराजवळ आयोजित केलेल्या या मोफत आरोग्य शिबिराचा मतदार संघातील सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केले. गिरगाव येथे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचा शुभारंभ झाला.
या शिबिरात डॉक्टरांकडून सर्व प्रकारच्या तपासण्या, शस्त्रक्रिया व अन्य उपचार पूर्णपणे मोफत केले जाणार आहेत. औषधाचा खर्च वगळता अन्य कोणताही खर्च करावा लागणार नाही. या शिबिराचा सर्व महिला रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या डॉ. सुषमा जोतकर, डॉ. शीतल पाटील, डॉ. विजय कटला, डॉ. अश्विनी लोकापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला रुग्णाची तपासणी करण्यात आली. सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच गिता पाटील, ग्रा. प. सदस्य उत्तम बापू पाटील, उत्तम नवाळे पाटील आदी उपस्थित होते. गिरगाव येथील माजी सैनिकांसाठी सांस्कृतिक सभागृह आणि शहीद जवान वासुदेव जाधव यांच्या स्मारकासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी २५ लाख रुपये निधी देण्याची ग्वाही दिली.यावेळी माजी सैनिक रघुनाथ पाटील, निवृत्ती पोवार, रघुनाथ साळोखे, आनंदा जाधव, मधुकर चव्हाण, किरण चव्हाण उपस्थित होते.