+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule03 Dec 22 person by visibility 635 categoryराजकीय
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढण्यासाठी उमेदवारांची वाणवा नाही. राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. बी पाटील गोकुळचे संचालक चेतन नरके यांच्यासह आणखी दोघे इच्छुक असल्याचे राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
  कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. काही दिवसापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाला उमेदवार शोधावे लागतील अशी बोचरी टीका केली होती.
 दरम्यान गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांनी दोन दिवसांपूर्वी गोकुळचे संचालक चेतन नरके हे कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवतील आणि त्यांच्या उमेदवारी संदर्भात  राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेऊ असे म्हटले होते.
या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या अनुषंगाने विचारले असता ते म्हणाले, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीकडे इच्छुक उमेदवारांची संख्या चार, पाच आहे. अरुण नरके यांनी चेतन नरके यांच्या उमेदवारी संदर्भात पक्षाचे नेते शरद पवार यांची भेट घालणार असल्याचे स्वतःहून सांगितले आहे. याशिवाय व्ही. बी. पाटील हे सुद्धा लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत. आणखी दोघे पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. पक्षाकडे उमेदवार आहेत. असे मुश्रीफ यांनी सांगितले
 मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रसारमाध्यमाशी मुश्रीफ हे बोलत होते. या बैठकीला आमदार राजेश पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी व्ही. बी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार राजू आवळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, बाबासाहेब पाटील आसुरलेकर, गोकुळचे संचालक किसन चौगुले, युवराज पाटील, मदन कारंडे, माजी महापौर आर.के. पोवार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखे, माजी नगरसेवक आदिल फरास आदी उपस्थित होते.