+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule21 Jul 24 person by visibility 319 categoryशैक्षणिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे मार्च - एप्रिल 2024 सत्रातील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. दरम्यान पावसाची संततधार आणि काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून 22 जुलै 2024 रोजी होणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित केले आहे. पाऊस व अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यास अडचण उद्भवू शकतात हे जाणून विद्यापीठ प्रशासनाने, सोमवारी 22 जुलै रोजी होणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलसचिव निवास माने यांनी दिली आहे. विविध भागात  गेले काही दिवस पावसाची संततधार सुरू आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ठिक ठिकाणचे वाहतूक मार्ग बंद झाले आहेत. दरम्यान जोरदार पाऊस होत असल्यामुळे सोमवारी होणारी परीक्षा स्थगित करावी अशी मागणी युवासेना शहरप्रमुख अॅड. मंदार पाटील यांनी सुद्धा विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती.