+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule07 Jul 24 person by visibility 117 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : कोल्हापूर प्रदूषण मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर देशी वृक्ष लागवड करून ती जगविणे हि काळाची गरज आहे.  देशी झाडे लावून हा परिसर निसर्गरम्य बनविण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जेष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले. 
 स्मॅक भवन व शिरोली औद्योगिक क्षेत्रात रस्त्यांच्याकडेने विविध ठिकाणी स्मॅक, एमआयडीसी व आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर या संस्थेमार्फत शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. 
 बैठकीस एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, उप अभियंता [ स्थापत्य ] अजयकुमार जी. रानगे, शिरोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक पंकज गिरी, सार्वजनिक बांधकाम विभाग चे उद्यान परिवेक्षक किसन गिरी, शिवाजी विद्यापीठाचे गार्डन सुप्रीटेंडंट अभिजीत जाधव, आझाद हिंद चॅरिटेबल ट्रस्टचे राहुल मगदूम  यांची उपस्थिती होती. 
बैठकीचे आयोजक सुरेन्द्र जैन म्हणाले या मोहिमे अंतर्गत शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये नैसर्गिकरित्या सुशोभीकरण करण्यात येणार आहे. लावलेल्या झाडांची निगा व देखभाल कारखानदारांनी करण्याची संकल्पना या मोहिमे पाठीमागे आहे.
या मोहिमेसाठी रोड मॅप तयार करण्यात येऊन, जनजागरणासाठी आकर्षक टॅग लाईन देण्यात येणार आहे. याप्रसंगी कार्यकारी अभियंता आय ए नाईक,  उपअभियंता अजयकुमार रानगे, उद्यान पर्यवेक्षक किसन गिरी, राहुल मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस स्मॅकचे ऑ. सेक्रेटरी भरत जाधव, खजानिस बदाम पाटील, संचालक राजू पाटील, शेखर कुसाळे, निमंत्रित सदस्य दीपक घोंगडी, विनय लाटकर, किरण चव्हाण, समिती सदस्य एम. वाय. पाटील, जयदत्त जोशीलकर उद्योजक निशिकांत खाडे, कुमार साळुंखे, सहदेव वरुटे, सुधाकर कुंभार, हरिभाऊ, सचिन पाटील आदी उपस्थित होते.