+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule15 Jul 24 person by visibility 294 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अतिक्रमणमुक्त विशाळगड मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. विशाळगडावर व गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमध्ये दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामुळे दिवसभर विशाळगड परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवराज संभाजीराजे व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करुन सोमवारपासून (१५ जुलै) प्रशासनाकडून अतिक्रमण हटविले जातील अशी ग्वाही दिली. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
विशाळगडवरील अतिक्रमण हा मुद्दा गेली काही वर्षे गाजत आहे. हिंदुत्ववादी संघटनाही याप्रश्नी आक्रमक झाल्या होत्या. हिंदुत्ववादी संघटनांनी आठ दिवसापूर्वी गडाच्या पायथ्याशी महाआरती केली होती. दुसरीकडे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनीही, प्रशासनाला विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासंबंधी आवाहन केले होते. पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येताच संभाजीराजे छत्रपती यांनी चौदा जुलैला ‘चलो विशाळगड’चा नारा दिला होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हजारो शिवभक्त विशाळगडाच्या पायथ्याशी जमले होते. काही तरुण शनिवारी रात्री गडावर दाखल झाले होते.
 युवराज संभाजीराजे हे रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरात तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. भवानी मंडप येथून त्यांनी विशाळगडाकडे कूच केले. ‘आई भवानी शक्ती दे-विशाळगडला मुक्ती दे, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय ’अशा घोषणा देत कार्यकर्ते त्यांच्यासोबत रवाना झाले. तत्पूर्वीच भर पावसात शिवभक्त गडावर पोहोचले होते. सकाळी दहाच्या सुमारास विशाळगडावर तोडफोडीच्या घटना घडल्या. रहमान मलिक दर्ग्याजवळ दगडफेकीचा प्रकार झाला. अनधिकृत दुकानांची मोडतोड केली. जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. स्थानिकांनी दगडफेकीचा प्रकार झाल्याचे सांगितले. तर शिवप्रेमींनीही प्रतिहल्ला झाल्याचा आरोप केला आहे. दगडफेक, मोडतोडीच्या घटनेने वातावरण तणावपूर्ण बनले. विशाळगडावरील तोडफोड, दगडफेकीचा प्रकार समजल्यानंतर जिल्हाधिकारी येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत पंडित हे गडावर दाखल झाले.
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास युवराज संभाजीराजे हे विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यांचे आगमन होताच उपस्थितांनी ‘जय भवानी, जय शिवाजी, विशाळगड अतिक्रमणमुक्त करा’अशा घोषणा दिल्या. संभाजीराजे यांनी शांततेचे आवाहन केले. प्रशासनाकडून जमावाला गडावर जाण्यास मनाई करण्यात आली. गडावरील दगडफेकीचा प्रकार, गडावर जाण्यास मनाई यामुळे संतप्त झालेल्या जमावाने गजापुरात दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड केली. एका घरातील सिलिंडरचा स्फोट घडला. यामुळे घराला आग लागली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. परिस्थिती चिघळू नये म्हणून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होते. मोठा पोलिस फौजफाटा बंदोबस्ताला होता. जिल्हाधिकारी येडगे, पोलिस अधीक्षक पंडित, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार रामलिंग चव्हाण हे घटनास्थळी तळ ठोकून होते.
 मुख्यमंत्री शिंदे यांनी युवराज संभाजीराजे व जिल्हाधिकारी येडगे यांच्याशी संपर्क केला. जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले. ज्या मिळकती न्यायप्रविष्ठ आहेत त्या वगळून इतर अनधिकृत मिळकती हटविल्या जातील. प्रशासनाकडून पंधरा जुलै २०२४ पासून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही होईल असे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.