आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. सुनील रायकर यांचे व्याख्यान
schedule12 Jan 25 person by visibility 32 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महविद्यालयांच्या मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. सुनील जे. रायकर यांनी रीसेंट अॅडव्हान्सेस इन मटेरियल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग (ICRAMM 2024) या सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये प्रमुख वक्ता म्हणून भाषण दिले. ही परिषद डिसेंबर महिन्यात तामिळनाडूच्या इरोड येथील वेलालर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे झाली.
डॉ रायकर यांनी "पॉलीमर-आधारित अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगचे भविष्य: मटेरियल इनोव्हेशन्स आणि स्लायसिंग तंत्रज्ञान" या विषयावर मार्गदर्शन केले. 3डी प्रिंटिंगच्या क्षेत्रात नवीन मटेरियल्सचा वापर व त्यांची क्षमता यावर सखोल प्रकाश टाकला. आधुनिक पॉलीमर मटेरियल्सच्या संशोधनामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेत होणाऱ्या सुधारणा स्पष्ट केल्या. यासोबतच, नाविन्यपूर्ण स्लायसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनाची अचूकता व गती वाढवता येईल, यावर त्यांनी उदाहरणांसह चर्चा केली. डॉ. रायकर यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.ए.के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.