+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustचंद्रकांत पाटलांची कोल्हापूरसाठी मोठी घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेज !! adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे चौदा संशोधक adjustमुस्लिम समाजातर्फे शहरातून शांतता फेरी adjustस्वच्छता ही सेवा अभियान ! सीईओसह अधिकारी सहभागी !! adjustएनआयटी कोल्हापूरमध्ये कौशल्यपूर्ण अभियंते घडतील - चंद्रकांत पाटील adjustऋतुराज पाटील यांच्याकडून क्षयरुग्णांना पोषण आहार किट adjustआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र adjustराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालियांचा शनिवारी नागरी सत्कार adjust ज्येष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार यांचे सात ऑक्टोबरला व्याख्यान adjust कोल्हापूर जिल्ह्यात ३९ कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ! पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन
1000926502
1000854315
schedule18 Sep 24 person by visibility 237 categoryशैक्षणिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
अमेरीकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जागतिक पातळीवरील आघाडीच्या संशोधकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर आणि डीन प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांनी जगातील अव्वल दोन टक्के संशोधकांमध्ये स्थान मिळवले आहे. डॉ. लोखंडे यांच्या या यशामुळे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
 अलाईड फिजिक्स विभागातील ख्यातनाम संशोधक म्हणून ओळख असलेल्या डॉ. सी. डी. लोखंडे यांनी संशोधन क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. डॉ. लोखंडे यांचे आतापर्यंत ६५० रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. अलाईड फिजिक्समधी अव्वल संशोधकांच्या यादीत त्यांनी देशातील पहिले स्थान कायम राखले असून जागतिक पातळीवर १८६ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
 पदार्थ विज्ञानातील तत्वांचा वापर करून प्रत्यक्ष व्यवहारातील प्रश्न सोडविणे तसेच तांत्रिक सुधारणा करणे व नवनवीन उपकरणे तयार करण्यासाठी डॉ. लोखंडे हे सातत्यपूर्ण संशोधन करत आहेत. गॅस सेन्सॉर, सुपरकॅपॅसिटर, पाण्याचे विघटन, सौर घट, उर्जा साठवणूक पद्धत आदी विषयात त्यांनी केलेल्या संशोधनामुळे ८० हून अधिक पेटंट प्राप्त झाली आहेत. 
    डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी या यशाबद्दल प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. लोखंडे यांचे यश अतिशय कौतुकास्पद व अभिमानास्पद असून त्यांनी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात अनेक संशोधक घडत आहेत. संशोधन क्षेत्रात विद्यापीठाचे योगदान आणखी वाढावे यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली. 
 संस्थेचे उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी जागातिक अव्वल संशोधकांच्या यादीत स्थान मिळवल्याबद्दृ लोखंडे यांचे अभिनंदन केले.