+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustचंद्रकांत पाटलांची कोल्हापूरसाठी मोठी घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेज !! adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे चौदा संशोधक adjustमुस्लिम समाजातर्फे शहरातून शांतता फेरी adjustस्वच्छता ही सेवा अभियान ! सीईओसह अधिकारी सहभागी !! adjustएनआयटी कोल्हापूरमध्ये कौशल्यपूर्ण अभियंते घडतील - चंद्रकांत पाटील adjustऋतुराज पाटील यांच्याकडून क्षयरुग्णांना पोषण आहार किट adjustआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र adjustराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालियांचा शनिवारी नागरी सत्कार adjust ज्येष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार यांचे सात ऑक्टोबरला व्याख्यान adjust कोल्हापूर जिल्ह्यात ३९ कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ! पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन
1000926502
1000854315
schedule19 Sep 24 person by visibility 350 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जगभरातील आघाडीच्या दोन टक्‍के संशोधकांची २०२४ या वर्षासाठीची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केली आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या १४ संशोधकांनी स्थान प्राप्त केले आहे. गेली पाच वर्षे सातत्याने शिवाजी विद्यापीठाचे संशोधकीय स्थान जगाच्या नकाशावर हे संशोधक अधोरेखित करीत आहेत, ही अत्यंत समाधानाची व आनंदाची बाब आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रमोद पाटील (पदार्थविज्ञान), निवृत्त प्रा. ए. व्ही. राव (पदार्थविज्ञान), निवृत्त प्रा. सी. एच. भोसले (पदार्थविज्ञान), निवृत्त प्रा. एस. पी. गोविंदवार (जैवरसायनशास्त्र), डॉ. केशव राजपुरे (पदार्थविज्ञान), डॉ. ज्योती जाधव (जैवरसायनशास्त्र), डॉ. ए. व्ही. मोहोळकर (पदार्थविज्ञान), डॉ. सागर डेळेकर (रसायनशास्त्र), प्रा. के. एम. गरडकर (रसायनशास्त्र), डॉ. टी. डी. डोंगळे (नॅनोसायन्स), डॉ. सुशीलकुमार जाधव (नॅनोसायन्स), डॉ. हेमराज यादव (रसायनशास्त्र) आणि संलग्नित महाविद्यालयांतील संशोधक डॉ. व्ही.एल. पाटील (पदार्थविज्ञान) व डॉ. एस.ए. व्हनाळकर (पदार्थविज्ञान) यांचा समावेश आहे. या संशोधकांचा आज विद्यापीठ कार्यालयात कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते ग्रंथभेट व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले,  एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशन या सेक्शन-८ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश राऊत यांनी आभार मानले.
.................................
असे आहे स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे रँकिंग
संशोधनाची गुणवत्ता निर्धारित करण्यासाठी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने शोधनिबंधाला मिळणारी सायटेशन्स, एच निर्देशांक, सहलेखकत्व, संशोधन लेखकाची नेमकी भूमिका या घटकांचा सारासार विचार करून सर्वसमावेशक आणि सर्वमान्य अशी संयुक्त सूचक (सी स्कोर) निर्देशांक काढून ही जागतिक आघाडीच्या २ टक्के संशोधकांची क्रमवारी प्रसिद्ध केली. ही प्रणाली आयसीएसआर लॅबद्वारे एल्सेव्हियरने प्रदान केलेल्या स्कोपस डेटाचा वापर करते. दरवर्षी ही प्रमाणित क्रमवारी जाहीर करण्यात येते. या रँकिंगमुळे केवळ एका विषयातीलच नव्हे, तर सर्व विषयांमधील गुणवत्तेची तुलना करणे शक्य झाले. स्कोपस' डेटाबेसवर आधारित 'एल्सव्हिअर'ने तयार केलेल्या यादीसाठी १९६० ते २०२४ या कालावधीमध्ये संशोधकीय योगदान देणार्‍या संशोधकांची सार्वकालिक कामगिरी आणि वार्षिक कामगिरी अशा दोन निकषांवर निवड करण्यात आली. २२ विज्ञान विषय आणि १७४ उपविषयांमधील संशोधनाची यात दखल घेतली गेली.